🌟मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्षपदी शिवराज काटकर....!


🌟तर सरचिटणीसपदी प्राचार्य सुरेश नाईकवाडे,कोषाध्यक्षपदी मन्सुर शेख यांची निवड🌟

(मुंबई येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची घोषणा,माजी अध्यक्ष शरद पाबळे यांची विश्वस्तपदी नियुक्ती)


मुंबई (दि.१० आक्टोंबर २०२४): 86 वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कार्याध्यक्ष म्हणून सांगलीचे पत्रकार शिवराज काटकर आणि सरचिटणीस म्हणून परभणीचे पत्रकार सुरेश नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भोळे यांच्यावतीने एस.एम.देशमुख यांनी काल, ९ ऑक्टोबर रोजी ही घोषणा केली. रोह्याचे मिलिंद अष्टीवकर हे परिषदेचे नवे अध्यक्ष आहेत.

 मराठी पत्रकार परिषदेची सर्वसाधारण सभा काल , बुधवारी (९ ऑगस्ट २०२४) मुंबई प्रेस क्लबच्या सभागृहात उत्साह पार पडली. याप्रसंगी परिषदेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. परिषदेच्या घटनेनुसार १ सप्टेंबर २०२४ रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी मिलिंद अष्टिवकर यांची निवड झाली होती. तर आज मुंबई येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत कार्याध्यक्षपदी शिवराज काटकर, सरचिटणीसपदी प्रा.सुरेश नाईकवाडे व कोषाध्यक्षपदी मन्सूरभाई शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

परिषदेच्या विश्वस्त पदाची एक जागा रिक्त होती. त्या जागेवर माजी अध्यक्ष शरद पाबळे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान, नवीन कार्यकारिणीने परिषदेची सूत्र हाती घेतली असून आता पुढील पंधरा दिवसांमध्ये कार्यकारिणी सदस्य, उपाध्यक्ष, विभागीय सचिव पदाच्या  नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहितीही एस.एम.देशमुख यांनी याप्रसंगी दिली. 

‘ स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेली मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची देशातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी पत्रकार संघटना आहे. परिषदेने पत्रकारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून पत्रकारांच्या सुख दुखात सहभागी होण्याची भूमिका परिषदेने घेतलेली असल्याने पत्रकारांनी परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र आलं पाहिजे असं आवाहन एस.एम.देशमुख यांनी केलं आहे.    'काळाची पावले ओळखून परिषदेने सातत्याने नव्या बदलांना अंगिकारणयाची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळेच राज्यातील डिजिटल पत्रकारांसाठी "डिजिटल मिडिया परिषद" सुरू केली असून नुकतीच तिची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. परिषदेच्या सदस्यांनी नव्या युगाच्या मिडियाचे महत्व लक्षात घेऊन त्याची उपेक्षा न करता डिजिटल मिडिया परिषदेला सहकार्य करावे,' असे आवाहनही देशमुख यांनी केले. 'आपली संघटना नवीन उंचीवर नेण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी, सभासद यांनी आगामी काळात काम करावे. परिषदेच्या सर्व बाबी अपडेट असल्यामुळे नवीन पदाधिकारी त्यांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील,’ असा विश्वासही एस एम देशमुख यांनी व्यक्त केला. 

विश्वस्त किरण नाईक यांनी पदं ही मिरवण्यासाठी नाहीत तर त्या माध्यमातून संघटना भक्कम करणे आणि पत्रकारांना कायम मदत करण्याचे काम पदाधिकऱ्यांनी करावे, असे आवाहन केले. नवनिर्वाचित विश्वस्त शरद पाबळे, शिवराज काटकर, सुरेश नाईकवाडे, अनिल वाघमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना संघटना अधिक भक्कम आणि व्यापक करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली निवडणूक अधिकारी अनिल भोळे याचा यावेळी सन्मान करण्यात आला बैठक यशस्वी करण्यासाठी मुंबई विभागाचे सचिव दीपक कैतके, अध्यक्ष राजा आदाटे, दीपक पवार आदिंनी विशेष परिश्रम घेतले.....

 ✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या