🌟'स्वबळावर लढायचं असेल तर काँग्रेसने जाहीर करावं' हरियाणाच्या निकालानंतर संजय राऊतांचा इशारा🌟
✍️ मोहन चौकेकर
✒️ भारताच्या उद्योग जगातील एक रत्न हरवले ; उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 वर्षी निधन ; एक देव माणूस हरवला
✒️ विधानसभेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, राज्यातील सात हजार सहाशे कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन, नागपूर, शिर्डी विमानतळाला नवीन टर्मिनल
✒️ राज्याला मिळाली ८ नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं... ८ पैकी ५ महाविद्यालयं एकट्या विदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
✒️ 'स्वबळावर लढायचं असेल तर काँग्रेसने जाहीर करावं', हरियाणाच्या निकालानंतर संजय राऊतांचा इशारा.. योग्यवेळी उत्तर देईन म्हणत संजय राऊतांच्या टीकेकडे नाना पटोलेंचा कानाडोळा
✒️ हम साथ साथ म्हणणारे, हम आपके है कौन, म्हणतायत, काँग्रेसबाबत संजय राऊतांच्या वक्तव्यावर बोट ठेवत देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला चिमटा
✒️ जागा हवी तर जिंकण्याच्या क्षमतेचा उमेदवार सांगा, मगच मतदारसंघ.. जागावाटपात भाजपची शिंदे आणि अजितदादा गटाला अट
✒️ माजी मंत्री राजेंद्र शिंगणे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे जाण्याची शक्यता, सुप्रिया सुळेंच्या गाडीत चेहरा झाकलेल्या शिंगणेंचा व्हिडीओ व्हायरल
✒️ लाडक्या बहिणी पाठोपाठ लाडक्या भावाला ही मिळणार पहिला हफ्ता.. राज्यातील ४६ हजार विद्यार्थ्यांना डीबीटी मार्फत ४२ कोटी रुपये मिळणार..
✒️ शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी काल उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती.. रविकांत तुपकर बुलढाणा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता.*
✒️ सिद्धिविनायक गणपती मंदिर गाभाऱ्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळी लागणार भगवा टिळा.. मंदिर न्यासाने जारी केले आदेश..
✒️ सोलापूरच्या पेनूर टोलनाक्यावर टोल चुकवत बॅरिकेट उडवणाऱ्या मालवाहू ट्रकने सुरक्षारक्षकाला चिरडले.. फरार ट्रकचालकाचा मोहोळ पोलिसांकडून शोध सुरू..
✒️ शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका.. जुहू येथील बंगला आणि पावना लेक परिसरातील फार्म हाऊस रिकामं करण्यासाठी पाठवलेल्या नोटीशीला आव्हान..
✒️ मला कोणालाही दुखवायचं नव्हतं, जे काही केलंय ते पवार साहेबांच्या परवानगीनेच केलंय, उपमुख्यमंत्री अजित पवारांची स्पष्टोक्ती ; भाजपसोबत राष्ट्रवादीने जावं हे प्रयोग ठरल्याप्रमाणे, मात्र ऐनवेळी त्यात काही बदल झाला; अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पुनरुच्चार
✒️ अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी कारमध्ये फाईलआड तोंड लपवून घेतली शरद पवारांची भेट,* अजित पवारांना आणखी एक धक्का! ; सचिन खरात यांनी सोडली अजितदादांची साथ, शरद पवारांची साथ देण्याचा घेतला निर्णय
✒️ मनोज जरांगेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक,नाशकात क्लिनिकमध्ये घुसून अंगावर शाई ओतली ; पोलिसांना पत्र देऊन 9 दिवस उलटले तरी मनोज जरांगेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळेना, बीडमध्ये मराठा समाज आक्रमक
✒️ वंचितचे दहा उमेदवार जाहीर, सर्वच्या सर्व मुस्लिम, प्रकाश आंबेडकरांची नवी रणनीती ;परभणीतील काँग्रेस नेता सय्यद समी सय्यद साहेबजान वंचितच्या गळाला; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांकडून उमेदवारीची घोषणा, 10 मतदारसंघात मुस्लिमांना संधी
✒️ हरियाणा निकालानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले, आता भूमिका घ्या, स्वबळावर लढायचं असेल तर सुद्धा सांगा! ; हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर मनोज जरांगे भडकले; महाराष्ट्र अन् हरियाणाचं राजकारण वेगळं, विधानसभेसाठी भाजपला इशारा
✒️ दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती ; वचनपूर्ती सोहळ्याला जाताना रायगड जिल्ह्यात लाडक्या बहिणींची बस 20 फूट दरीत कोसळली; कोणीतीही जीवीतहानी नाही
✒️ सरळ सेवा भरतीतील प्रतीक्षा यादीतील 1058 उमेदवारांना एसटी सेवेत घेणार; एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांची माहिती ; सरकारकडे थकित असलेल्या पैशांची यादी वाचली, श्रीरंग बरगेंचा एसटी अन् कर्मचाऱ्यांच्या स्थितीचं वास्तव मांडत हल्लाबोल
✒️ सावधान! सोयाबीन उडीद झाकून ठेवा, आजपासून पावसाचा जोर वाढणार, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात पडणार पाऊस
✒️ सोलापुरात टोल न देता बॅरिकेट तोडून निघालेल्या ट्रकने टोलच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला चिरडले, घटना कॅमेऱ्यात कैद ; मुंबईत धक्कादायक घटना; बेस्ट बसने शाळेतून घरी जाणाऱ्या 12 वर्षांच्या मुलाला चिरडलं
✒️ वादाची 'वाळवी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या