🌟निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟आदर्श आदर्शसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी🌟

(महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024) 


परभणी (दि.16 आक्टोंबर 2024) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत. चारही विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कार्यक्रम व आदर्श आचारसंहितेबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. त्या वेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी श्री. गावडे म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून प्राप्त सुचनांचे काटेकोर पालन करावे. कुठल्याही प्रकारे चूक होऊ देऊ नये. मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना केल्या. आचारसंहितेत काय करावे, कार्य करु नये याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. विधाते यांनी  नोडल अधिकाऱ्यांनी  त्यांना सोपविलेल्या जबाबदारीबाबत सूचना केल्या......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या