🌟आपल्या मेंदूमृत मुलाच्या अवयवदानातून नवले कुटुंबाने दिले ३ रुग्णाला जीवदान🌟
परभणी (दि.२५ आक्टोंबर २०२४) :- परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील मेंदूमध्ये झालेल्या आंतर्गत रक्तस्त्रावामुळे मेंदूमृत झालेल्या १८ वर्षीय युवकाच्या अवयवदानामुळे ३ गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले. मेंदूमृत रुग्णाच्या यकृताचे व दोन किडण्यांचे प्रत्यारोपण गरजू रुग्णांवर करण्यात आले त्यामुळे ते लवकरच निरोगी आयुष्य जगू शकणार आहेत अवयवदान केलेला ब्रेनडेड १८ वर्षीय युवक हा जिंतूर येथील रहिवासी होता आणि तेथे ज्ञानोपासक महाविद्यालयात वाणिज्य शाखेत इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता.
या संदर्भात अधिक माहिती देताना परभणी येथील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. एकनाथ गषबाळे यांनी सांगितले की, "जिंतूर येथील १८ वर्षीय सार्थक प्रवीण नवले या रूग्णाचा मेंदू मृतवत झाल्याने नातेवाईकांनी घेतलेल्या निर्णयानुसार दोन किडण्या व यकृत काढण्यात आले. त्या अवयवांचे गरजू रुग्णांना प्रत्यारोपण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथे तिन्ही अवयव पाठवण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश लखमावार, देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमचे प्रमुख डॉ.एकनाथ गबाळे, डॉ.अतुल जाधव, डॉ.राहुल टेंगसे, डॉ.अमिताभ कडतन, डॉ.मनोज सोनी, डॉ.श्रध्दा गबाळे, डॉ.विजय बोंडे, अवयवदान व देहदान चळवळीचे मार्गदर्शक, समन्वयक विनोद डावरे आदी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या