🌟परभणी जिल्ह्यात आज शुक्रवार दि.२५ आक्टोंबर पासून दुचाकी वाहनधारकांसाठी हेल्मेट वापरण्याची सक्ती....!


🌟उल्लंघन करणार्‍या दुचाकी वाहनधारकांवर होणार दंडात्मक कारवाई🌟

परभणी :- परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शहरी/ग्रामीण भागात अपघातांचे वाढते प्रमाण व त्या अपघातातून होणारे मृत्यू आणि गंभीर जखमींच्या वाढत्या घटनांमध्ये घट आणण्याकरीता परभणी जिल्हा पोलिस प्रशासनाने दुचाकी मोटारसायकल स्वारांसाठी आज शुक्रवार दि.२५ आक्टोंबर पासून हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे.

            या हेल्मेट सक्ती मोहिमेंतर्गत ग्रामीण भागातून शहरात किंवा एका तालुक्यातून दुसर्‍या तालुक्यात प्रवास करणार्‍या सर्व मोटारसायकलस्वारांना हेल्मेट वापरणे बंधनकारक ठरणार आहे.  या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईसुध्दा केली जाणार असल्याची माहिती महामार्ग पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या