🌟मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर मध्यरात्री पावणेतीन वाजता चेंगराचेंगरी 9 प्रवासी जखमी🌟
* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, चिंचवडमध्ये राहुल कलाटे; परळीत धनंजय मुंडेंविरुद्ध राजेसाहेब देशमुख मैदानात ; अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, पारनेरमध्ये निलेश लंकेंच्या पत्नीविरुद्ध काशिनाथ दाते यांना उमेदवारी
* मंत्री धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांचा मोठा डाव,परळीत मराठा कार्ड,राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी ; परळी मतदारसंघात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक; राजेभाऊ फड यांना उमेदवारी न मिळाल्याने पक्षाचे बॅनर फाडले
* 312 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवास भोगलेल्या रमेश कदमांच्या 26 वर्षीय कन्या सिद्धी कदम यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दिली उमेदवारी ; बारामतीत भावाची भावकी झाली, पुत्र युगेंद्रसाठी बाप उतरला मैदानात; श्रीनिवास पवारांनी अजित पवार यांच्याविरुद्ध फोडला प्रचाराचा नारळ
* अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिल्याचा वचपा मनसे काढणार, कोपरी-पाचपाखडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें विरोधात अभिजित पानसेंना रिंगणात उतरवणार ; शिवसेना आणि काँग्रेसमध्ये 10-12 जागांवरील मतभेद अद्यापही विकोपाला, परस्पर उमेदवारी दिल्यानं काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची सूत्रांची माहिती
* भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक दुश्मनी नाही, ते केवळ आमचे राजकीय शत्रू; संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले
* पुण्यातील कोथरूडमधून मविआचा उमेदवार ठरला! चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंना ठाकरेंच्या शिवसेनेनं दिली संधी
* भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर बेड्या ; आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, त्यांच्यावर कडक कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे
* 'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांवर साधला निशाणा ; पराकोटीचं दुर्दैवी कृत्य सरकार करतंय; जयश्री थोरातांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरातांची संतप्त प्रतिक्रिया
* मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर मध्यरात्री पावणेतीन वाजता चेंगराचेंगरी, 9 प्रवासी जखमी, रेल्वे पोलिसांचं क्राऊड मॅनेजमेंट फेल ; वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीच्या घटनेवरून आदित्य ठाकरेंचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर हल्लाबोल, म्हणाले, 'रील'मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवं.'
* बीसीसीआय ॲक्शन मोडवर! सलग दोन पराभव लागले जिव्हारी, स्टार खेळाडूंच्या दिवाळीच्या सुट्ट्या केल्या रद्द
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या