🌟पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामपंचायत प्रशासनाचा निर्लज्ज कारभार ? भारत-पाक युध्दातील शहिदाच्या स्मारकाचा केला अवमान....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तात्काळ लक्ष देऊन कठोर उपाययोजना करण्याची सर्वसामान्य जनतेची मागणी🌟 


परभणी-हिंगोली हा संयुक्त जिल्हा असतांना सन १९६५ साली झालेल्या भारत-पाकीस्तान युध्दात या संयुक्त जिल्ह्यात पुर्णा तालुक्यातील गौर येथील विरगती प्राप्त झालेले एकमेव शहीद जवान सुर्यकांत नामदेवराव जोगदंड यांच्या स्मारकासाठी गौर ग्रामपंचायत प्रशासनाने दि.२५ फेब्रुवारी २०१९ रोजी सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ०६ अन्वये ठराव पास करुन शाहिद जवान सुर्यकांत जोगदंड यांच्या स्मारकासाठी जागा राखीव केली खरी परंतु गौर ग्रामपंचायत प्रशासनाने सदरील शहिद विरजवान सुर्यकांतराव जोगदंड यांना सातत्याने अवमान करण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास येत असून गौर ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांनी मागील वर्षी सन २०२३ साली 'मेरी मिठ्ठी मेरा देश' या अभियाना अंतर्गत या शहिद जवान सुर्यकांत जोगदंड यांच्या स्मारकाच्या जागेवर लावलेल्या शिलालेखावर बेकायदेशीररित्या वन शहिद सदाशिव त्र्यंबकअप्पा नागठाणे यांच्या देखील नावाचा समावेश करुन त्या शिलालेखावर भारत-पाकीस्तान युध्दात शहिद झालेल्या विराजमान सुर्यकांत जोगदंड यांचा अत्यंत एकेरी भाषेत उल्लेख तर केलाच त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या शहिद स्मारकाचे कुठल्याही प्रकारचे पावित्र्य न राखण्याचे महापाप देखील ग्रामविकास अधिकारी लाडेकर व ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच यांनी या स्मारकाची अशी अवस्था केली की या जागेचा लोक अक्षरशः प्रांतविधीसाठी वापर देखील करीत आहेत.


गौर ग्रामपंचायत प्रशासन शहिद जवानांच्या आदर सन्मानाप्रती किती निष्क्रिय आहे याचा प्रत्यय या शहिद स्मारकाच्या झालेल्या दयनीय अवस्थेकडे बघितल्यास दिसून येत असून ग्रामविकास अधिकारी लाडेकर व ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच हे संपूर्णतः विराजमान सुर्यकांत जोगदंड यांच्या अवमानास जवाबदार असल्यामुळे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या