🌟महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या....!


 🌟निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय,राज्यातील 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या🌟

✍️मोहन चौकेकर

👁️ अजित पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता, रामराजे निंबाळकरांनी बोलावला फलटणच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, शरद पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा  ; रामराजेंसोबत त्यांचे आमदार दीपक चव्हाणही शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर, सूत्रांची माहिती

👁️ शिवरायांचा राज्याभिषेक रोखणारी विचारधारा, नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला, कोल्हापूरमधून राहुल गांधींची भाजपवर टीका ; कोल्हापुरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी 

👁️ मविआ सरकारने अनेक योजना बंद केल्या, काँग्रेस दिल्लीत युवकांना नशेचं व्यसन लावत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाशिमच्या सभेतून गंभीर आरोप ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी बंजारा समाजाचे धर्मगुरू कबीरदास महाराजांना पितृशोक, पितृशोकाचं वृत्त स्वतःपुरतं मर्यादीत ठेवत कबीरदास महाराज कार्यक्रमात सहभागी 

👁️ प्रकल्पांच्या नावाखाली राज्याला लुटताय, तुमच्या लुटीचा हिशोब मांडणार, उद्धव ठाकरेंचा महायुतीला इशारा

👁️ निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या 

👁️ काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक,युवकाचा जागेवरच मृत्यू,गणेश हांडोरेला बेड्या

👁️ राज्याचे माजी मंत्री राजेंद्र गावित भाजपला सोडचिठ्ठी देणार, लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार  ; इंदापूरनंतर जुन्नरमध्येही शरद पवार धक्कातंत्र देण्याच्या तयारीत, अजितदादांचे आमदार अतुल बेनकेंना घेरण्यासाठी निष्ठावंत शिलेदार मोहित ढमाले यांना मैदानात उतरवणार असल्याची चर्चा 

👁️ अवघ्या 5 वर्षांच्या चिमुरड्याला अश्लील व्हिडीओ दाखवला, अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला,पुण्याच्या कोंढव्यातील धक्कादायक घटना 

👁️ रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना  

👁️ ऋतुराज गायकवाडचं 'बॅड लक', अजिंक्य रहाणेने संपवला दुष्काळ, 27 वर्षांनंतर इराणी ट्रॉफीवर मुंबईचा कब्जा 

👁️ मराठी भाषेला अभिजात दर्जा वगैरे राजकीय गोष्टी, या सगळ्याला फार महत्त्व देऊ नये; ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडेंचं रोखठोक मत  

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या