🌟नांदेड महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागातील सहाय्यक आयुक्तांकडून नियमबाह्य पद्धतीने श्री.गणपती विसर्जन....!


🌟धार्मिक भावनेचा अनादर केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त गुलाम मोहम्मद सादेक यांच्यावर गुन्हा दाखल करा - गौतम जैन 

नांदेड (दि.१६ आक्टोंबर २०२४) :- महाराष्ट्र राज्यासह देशात सर्वत्र धार्मिक परंपरेनुसार विधिवत पध्दतीने पुजा अर्चना करुन श्री गणरायाला निरोप देऊन विसर्जन केले जात असतांना नांदेड शहरात मात्र महानगर पालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाकडून स्वच्छता विभागाचे सहायक आयुक्त गुलाम मोहम्मद सादेक यांच्याकडून नियमबाह्य पद्धतीने श्री.गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते या कृत्रिम तलावा संदर्भात शासनाचा कोणताही आदेश उपलब्ध नाही असे उत्तर दस्तुरखुद्द सहाय्यक आयुक्त स्वच्छता विभाग यांनी तक्रार अर्जदार गौतम जैन यांना दिल्यानंतर त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी, नांदेड महानगर पालिका आयुक्त यांच्यासह नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन देवून नियमबाह्य व मनमानी पद्धतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करुन श्री गणपती विसर्जन करीत धार्मिक भावना दुखावणाऱ्या स्वच्छता विभागातील सहाय्यक आयुक्त गुलाम मोहम्मद सादेक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तक्रारदार गौतम जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की शासनाचा कुठलाही आदेश नसतांना नांदेड महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून छोटे-छोटे कृत्रित तलाव (खड्डे) तयार करण्यात आले त्यात श्री गणेश मुर्त्यांचे विसर्जन करून त्या गणेशमुर्तीवर माती टाकून ते खड्डे बंद करण्यात आले त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या 

श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी महानगरपालिकेने अनेक ठिकाणी कृत्रिम छोटे-छोटे तलाव (खड्डे) तयार करून त्यात श्री गणेशभक्तांना गणेश विसर्जन करायला लावले. त्यानंतर त्या कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या गणेश मुर्त्यांवर माती टाकून ते कृत्रिम तलाव बुजवण्यात आले या गंभीर प्रकरणा संदर्भाने गौतम जैन यांनी अगोदर माहितीच्या अधिकारात नांदेड महानगरपालिकेकडे माहिती मागितली तेंव्हा गणेश विसर्जन करण्यासंदर्भाचे कोणतेही शासन आदेश उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला माहिती देता येत नाही असे लिहुन गौतम जैन यांनी मागितलेल्या माहितीचा अर्ज निकाली काढण्यात आल्याने गौतम जैन यांनी मनपा स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त गुलाम मोहम्मद सादेक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असा तक्रार अर्ज जिल्हाधिकारी नांदेड,जिल्हा पोलीस अधिक्षक नांदेड यांच्यासह महानगर पालिका आयुक्त नांदेड यांना देखील दिला आहे. 

नांदेड महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून कृत्रिम तलावांची निर्मिती करुन त्या छोट्या छोट्या तलावामध्ये गणपती विसर्जनानंतर त्या तलावातील मुर्त्यांवर माती टाकून गणपती मुर्तीना पुरून टाकण्यात आल्यानतरचे व्हिडीओ चित्रीकरण देखील गौतम जैन यांच्याकडे उपलब्ध असल्याचे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या