🌟अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने बिव्हीजीचे व्यवस्थापक व गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली🌟
नांदेड (दि.०३ आक्टोंबर २०२४) - नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्ड अंतर्गत बाह्यस्त्रोता मार्फत कर्मचाऱ्यांकडून मजुरांचा पुरवठा करून काम करून घेतल्या जाते या मजुरांना मागील वर्षी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वेतनवाढ व दिवाळी बोनस देण्याची मागणी शिष्टमंडळाच्या वतीने बिव्हीजीचे व्यवस्थापक व गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.
सचखंड गुरुद्वारा बोर्ड अंतर्गत यात्री निवासांच्या व्यवस्थापन व देखभालीसाठी बाह्य स्त्रोतांतर्गत मजूर पुरवठा कंत्राट देण्यात आले आहे. हे कंत्राट पुणे येथील बीव्हीजी कंपनीकडे तीन वर्षासाठी देण्यात आले आहे. कामाच्या सुरुवातीपासून कंपनीने कर्मचारी व मजुरांना दरवर्षी पगार वाढ व दिवाळी बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते देण्यात आले नसल्याने मागील वर्षी कामगारांकडून काम बंद आंदोलन केले असता कंपनीने पगारवाढ देण्यात आली व पुढील वर्षी पगार वाढ व बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला केराची टोपली दाखवत यावर्षी कंपनीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे किमान यावर्षी तरी पगारवाढ व दिवाळी बोनस देण्यात यावे अशी मागणी शिष्टमंडळाने बीव्हीजी कंपनीचे व्यवस्थापक व गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर जगदीपसिंघ नंबरदार, गुरमीतसिंघ सरदार, नरेंद्रपालसिंघ महाजन, गुरसेवकसिंघ कारागीर , अरविंदरकौर गाडीवाले, जगदीपसिंघ रागी , तेजपालसिंग नवाब, हरमिंदरसिंघ खालसा, हरमितसिंघ बासरीवाले, साहेबराव कांबळे, हिरामण चव्हाण, स. प्रेमसिंघ शिलेदार,अजितसिंघ पाटनुरवाले यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत......
0 टिप्पण्या