✍️ मोहन चौकेकर
💫 चला शिवस्मारक शोधायला, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती मुंबईत धडकले, 8 वर्षे उलटूनही अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम झालं नसल्याने आंदोलनाचं शस्त्र ; सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून का उभा राहिला नाही? संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल ; पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजले, डीसीपी मुंडेंना म्हणाले, त्यांना कुठे न्यायचं नाही
💫 रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे घात झाला,मुंबईतील चेंबूरमध्ये चाळीतील दुमजली घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू ; गुप्ता परिवारातील सात लोकांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून छेदीराम गुप्तांना 35 लाखांच्या मदतीची घोषणा
💫 प्रहारच्या बच्चू कडूंना मोठा धक्का, मेळघाटचे आमदार राज कुमार पटेल यांनी साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार ; शिवसेना शिंदे गटाला याचे परिणाम भोगायला लावू; आमदाराने साथ सोडल्यानंतर बच्चू कडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा
💫 राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार माढ्यात बबन शिंदेंकडे तुतारी सोपवण्याची शक्यता, माढ्यात रणजित शिंदेंना उमेदवारी देऊन करमाळ्यातही मोठी खेळी करण्याची शक्यता; विधानसभेसाठी 8 जणांनी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचे आमदार शरद पवारांच्या भेटीला; संदीप क्षीरसागर म्हणाले, बीडमधून मीच लढणार
💫 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आणखी एका उमेदवाराची घोषणा, अकोलेतून पुन्हा एकदा किरण लहामटे यांना मैदानात उतरवलं ; गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही, पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाहीत, अमोल कोल्हेंचा अजितदादांना खोचक टोला
💫 हिंमत असेल तर दोघं अपक्ष लढू, रामराजें निंबाळकरांचे ओपन चॅलेंज, रणजितसिंह निंबाळकर म्हणाले,ते तुतारी हाती घेतील
💫 हे सरकार दिलेला शब्द पाळत नाही, मराठा आरक्षणासाठी बीडमधील तरुणाची आत्महत्या ; युवकाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार, त्यांना मी सोडणार नाही, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा इशारा
💫 ज्येष्ठ साहित्यिका प्रा.डॉ.तारा भवाळकर यांची 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
💫 पुण्यातील बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाईल नबंरची तपासणी; आरोपींचे स्केच कोंढवा पोलिसांकडून प्रसिद्ध ; साताऱ्यातील कास पठार पाहाण्यासाठी निघालेल्या चौघांवर काळाचा घाला, भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत पुणे - पंढरपूर मार्गावर जागीच मृत्यू ; नंदुरबारमध्ये भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपात शिरला, 100 मेंढ्या चिरडून ठार; कोंडाईबारी घाटातील वाहतूक ठप्प
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या