🌟नागपुर व औरंगाबाद येथे दि.30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोकअदालत🌟
परभणी (दि.18 आक्टोंबर 2024) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या पत्रानुसार मा. उच्च न्यायालय, मुंबई व अंतर्गत खंडपीठ नागपुर व औरंगाबाद येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2024 व 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकअदालतीमध्ये मा. उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोड पात्र प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले जाणार आहेत. या लोकअदालतीमध्ये पक्षकार/Stakeholders सहभाग घेवू शकतात. ज्या पक्षकार/ Stakeholders यांची प्रकरणे प्रलंबित असुन तजडजोडीने मिळविण्याची इच्छा असल्यास त्याबाबत त्यांनी त्यांच्या सन्माननीय विधीज्ञांशी संपर्क करावा. अधिक माहितीसाठी संबंधीत मा. उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अर्चना एम. तामणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांनी केले आहे......
0 टिप्पण्या