🌟नांदेडात हजारोंच्या उपस्थितीत सुसंवाद आणि करुणेसाठी 'महा बुद्धवंदना'.....!


🌟पूज्य भिक्खू संघाच्या उपस्थितीत 'महा बुद्धवंदनाचे'आयोजन🌟


नांदेड : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अशोक विजया दशमीदिनी सकाळी ७ वाजता हजारो उपासक, उपासिकांच्या उपस्थितीमध्ये 'महा बुद्धवंदने'चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अडीच हजार वर्षांपेक्षा जास्त देदीप्यमान असा वारसा लाभलेल्या बौद्ध धम्माचा, आपल्या समृद्ध परंपरांचा उत्साह तेवत ठेवणेसाठी, भगवान बुद्धाच्या शिकवणींचा आदर करण्यासाठी आणि सुसंवाद, करुणा आणि सजगता वाढविण्यासाठी नांदेड शहरातील आंबेडकरवादी युवकांनी पुढाकार घेत महा बुद्धवंदनेचे अशोक विजयादशमी दिनी (दि. १२ ऑक्टोबर) पूज्य भिक्खू संघाच्या उपस्थितीत आयोजन केले होते.


नांदेड शहर अलीकडच्या काळामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक चळवळीचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेले आहे. भदंत विनय बोधिप्रिय, भदंत पय्यारतन, भदंत रेवत बोधीसह भिकू संघाच्या प्रमुख उपस्थितीत तसेच हजारो अबाल वृद्ध, श्रद्धावान उपासक, उपासिकांच्या उपस्थितीमध्ये हा महा बुद्धवंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला. 

भारतीय बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष पी. एम. वाघमारे, रविकिरण जोंधळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नांदेड शहरातील आंबेडकरवादी युवकांनी सहभाग नोंदवत या महा बुद्धवंदनेचे उत्कृष्ट नियोजन केले. तसेच जिल्हा पोलीस प्रशासन, महानगर पालिका प्रशासन यांचे यथोचित सहकार्य लाभले. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. पी. गायकवाड यांनी केले तर  या कार्यक्रमाची प्रस्तावना रोहन कहाळेकर यांनी केली. आभार प्रशिक गायकवाड यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्निल नरबाग, गब्बर सोनवणे, नितेश हनुमंते, दिनेश येरेकर, अनिकेत सोनवणे, कपिल ढवळे, अभिमान राऊत, कपिल सदावर्ते, योगेश सोनुले, लखन कारले, लखन वाठोरे, कपिल वावळे, संजय सोनकांबळे, शुक्लोधन गायकवाड, आतिश ढगे, वृषभ महाबळे आदींनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या