🌟परभणील जुना पेडगाव रोड परिसरातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन.....!


🌟आढळून आल्यास नानलपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांच्याशी मो.नं. 8668583366 संपर्क साधावा🌟 

परभणी (दि.18 आक्टोंबर 2024) : परभणी जिल्ह्यातील लक्ष्मी नगर,जुना पेडगांव रोड,परभणी येथून महिला निघून गेली असून तिच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलीसांचा शोध सुरु आहे. तरी खालील वर्णनाची महिला व तिची मुलगी कुणाला आढळुन आल्यास त्यांनी पोलीस निरिक्षक,पोलीस स्टेशन नानलपेठ जि.परभणी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

लक्ष्मी नगर, जुना पेडगांव रोड, परभणी येथील मुंजाजी प्रभाकरराव बोबडे यांच्या तक्रारीवरुन बहीण कल्याणी भ्र. अमर कोसेकर वय 29 वर्ष व तिची लहान मुलगी आमृता वय 09 वर्षे हिस सोबत घेवून दि. 10 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 07 वा. च्या दरम्यान घरातून निघून गेली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन नानलपेठ जि. परभणी या पोलिस ठाण्यात गु.र.क्र. 35/2024 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलेचे वर्णन रंग गव्हाळ, चेहरा गोल, बांधा मजबुत, उंची 5 फुट, अंगात बदामी कलरचा पंजाबी ड्रेस, मराठी व हिंदी भाषा बोलता येते. मुलीचे वर्णन रंग गव्हाळ, चेहरा गोल, उंची 2.5 फुट, बांधा संडपातळ अंगात लाल कलरचा फ्रॉक, मराठी व हिंदी भाषा बोलता येते. या प्रकरणी कोणाला अशा वर्णनाची महिला व मुलगी आढळून आल्यास त्यांनी पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन नानलपेठ जि. परभणी दु. क्र. 02452-220450 (मो.नं. 8668583366, 866904989) यांच्याशी संपर्क साधावा असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या