🌟मा.सरपंच राजेंद्र भीमराव राऊत यांच्या उपचारकरिता त्यांच्या परिवारास दिली ५० हजार रुपयाची रोख आर्थिक मदत🌟
✍️ मोहन चौकेकर
बुलढाणा : दहिद बु येथील धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांचे खंदे समर्थक असलेले मा. सरपंच राजेंद्र भिमराव राऊत यांचा दोन वर्षांपूर्वी गंभीर असा अपघात झालेला होता या अपघातामध्ये, त्यांना कंबरेच्या खालील भागाला जबर मार लागल्यामुळे त्यांना काहीही हालचाल केले जात नाही, सद्यस्थितीमध्ये पुणे येथील मांजरी खुर्द येथे ए.पी.डी सेंटरला त्यांच्यावर उपचार सुरू असल्यामुळे त्यांच्या परिवारास आज दिनांक- ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय बुलढाणा येथे आमदार संजय गायकवाड यांच्यावतीने रुपये ५० हजाराची रोख आर्थिक मदत करण्यात आली यावेळी त्या ठिकाणी त्यांच्या परिवारातील सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड आणि दहिद बुद्रुक येथील असंख्य नागरिक उपस्थित होते...
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या