🌟गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून मनसेचा वाघ मैदानात....!


🌟शेवटच्या दिवशी गंगाखेड मतदार संघात मनसेचे उमेदवार रुपेश देशमुख यांनी आपला भरला उमेदवारी अर्ज🌟


परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी शेतमजूर कामगारांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे एकमेव नेतृत्व म्हणून स्वकर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणारे मनसेचे परभणी जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांची गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घोषणा केली होती. 

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून रुपेश भैया देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दि.२९ आक्टोंबर २०२४ रोजी अत्यंत शांततेत कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करत इतर उमेदवारांच्या तुलनेत सर्व सामान्य नागरिका प्रमाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला गंगाखेड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या जवळपास सर्वच उमेदवारांनी मोठ्या जल्लोषात शक्ती प्रदर्शनाद्वारे आपल्या समर्थकांसह तर काहींनी आपल्या पडद्या मागील तस्कर माफियांसह गुत्तेदारांचे टोळके देखील रॅलीत सहभागी करून साम दाम दंडाचे प्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ट्रेण्ड सुरू केला असताना मनसेचे नुकतेच जाहीर झालेले उमेदवार रुपेश देशमुख यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने आपल्या प्रमुख पदाधिकारी यांना सोबत घेत उमेदवारी अर्ज दाखल केला.

 यावेळी त्यांच्या सोबत यादव महात्मे,राहुल डोंगरे, गोविंद राज ठाकर, अनिल बुचाले, बापूराव पेदमपल्ली,गजानन भुसणर,पंकज राठोड,राहुल चव्हाण,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या