🌟माजी आमदार सिताराम घनदाट यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट🌟
परभणी :- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र विधानसभेत तब्बल तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले अभ्युदय बॅंकेचे अध्यक्ष माजी आमदार आमदार सिताराम घनदाट मामा घनदाट यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट सदिच्छा भेट घेतली.
महाराष्ट्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत गंगाखेड विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली याकरीता प्रयत्नशील असलेल्या माजी आमदार सिताराम घनदाट च्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सिताराम मामा घनदाट यांच्याऐवजी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वाट्याला गंगाखेड विधानसभा मतदारसंघ सुटून मागील सन २०१९ यावर्षी झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ६३ हजार १११ मत घेऊन द्वितीय क्रमांकावर राहिलेल्या शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांना उमेदवारी बहाल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सिताराम घनदाट यांच्यात आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यातील झालेल्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून माजी आमदार सिताराम घनदाट वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून गंगाखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात असतांनाच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार सिताराम घनदाट मामा यांची वर्णी लागली असल्याचे अधिकृत सुत्रांकडून कळाले आहे....
0 टिप्पण्या