🌟पुरवठा विभागाच्या आदेशानंतर अनेक शासकीय स्वस्त धान्य दुकानदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर ?🌟
🌟स्वस्त धान्य दुकानदारांकडून आचारसंहिता लागण्यापूर्वी आनंदाचा शिधा वाटपास टाळाटाळ🌟
🌟असंख्य शिधापत्रिका धारकांच्या आनंदावर विरजण पडण्याची चिन्हे🌟
महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संयुक्त महायुती सरकारने सर्वसामान्य गोरगरीब शिधापत्रिका धारकांना सन उत्सवाच्या काळात सन उत्सव आनंदात साजरा करता यावा करीता शासकीय स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून अल्पशा दरात 'आनंदाचा शिधा' वाटपास सुरुवात केली केवळ शंभर रुपयांत मिळणाऱ्या या 'आनंदाचा शिधा' किट मध्ये ०१ किलो साखर,०१ किलो रवा,०१ तुरदाळ,०१ किलो चनादाळ,०१ किलो मैदा आदी खाद्यपदार्थांचे वाटप केल्या जात होते त्यामुळे सर्वसामान्य शिधापत्रिका धारकांचा सन आनंदात साजरा होत होता.
महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या या 'आनंदाचा शिधा' वाटप योजना मागील एप्रिल २०२४ या महिन्यात लोकसभा निवडणूक काळात लागलेल्या आचारसंहितेमुळे बारगळल्याचे दिसत असून आदर्श आचारसंहीतेचा फायदा घेऊन एप्रिल महिन्यात गुडी पाडवा/रमजान ईद तसेच भिम जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका धारकांना वितरीत करण्यासाठी प्राप्त झालेल्या 'आनंदाचा शिधा' किटसह साड्या देखील पुर्णा शहरासह तालुक्यातील अनेक शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांनी गडप केल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता त्याच घटनांची पुनरावृत्ती पुन्हा एकदा दसरा-दिवाळी सनाच्या काळात होते की काय ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर या महिन्यात १० आक्टोंबर २०२४ नंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील शिधापत्रिका धारकांना दसरा-दिवाळी सनाच्या काळात 'आनंदाचा शिधा' वाटपाचे निर्देश दिल्यानंतर पुर्णा तहसिल प्रशासनांतर्गत येणाऱ्या पुरवठा विभागाने शिधापत्रिका धारकांना वाटपासाठी काल शुक्रवार दि.०४ आक्टोंबर २०२४ रोजी पासून शहरासह तालुक्यातील तब्बल ११५ स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय स्वस्त धान्य प्रणालीतील गहू तांदूळासह 'आनंदाचा शिधा' किटचे देखील वाटप केले
पुर्णा तालुका पुरवठा विभागातील पुरवठा अधिकारी नाईक यांनी तालुक्यातील जवळपास ११५ शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांना वाट्सॲपसह सोशल मिडियाच्या माध्यमातून ज्या दुकानात आनंदाचा शिधा पोहोचला आहे त्यांनी सर्व प्रथम 'आनंदाचा शिधा' किट वाटपास सुरुवात करावी व त्यानंतर धान्य वाटप करावे कारण पुढील आठवड्यात 'आदर्श अचार संहिता' लागण्याची शक्यता आहे याची नोंद घ्यावी' असे आदेश जारी केले परंतु सर्वसामान्य जनतेसह 'शिधा पत्रिका' धारकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल की दसरा सनाला अवघे सहा दिवस उरले असतांना व राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असतांना शिधापत्रिका धारकांना शहरासह तालुक्यातील असंख्य स्वस्त धान्य दुकानदारांचे मोबाईल फोन 'नॉट रिचेबल' दाखवत असून तर काहींचे मोबाईल फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे आढळून येत असल्यामुळे मागील एप्रिल २०२४ या महिन्यातील सन उत्सवांप्रमाणेच दसरा दिपावली सनात देखील सर्वसामान्य शिधापत्रिका धारकांच्या आनंदावर विरजण पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दरम्यान लोकसभा/विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागणारी 'आदर्श आचारसंहिता' याहीवेळी सर्वसामान्य शिधापत्रिका धारकांच्या मुळावर आणि पुरवठा विभागातील घोटाळेबाज तसेच सर्वसामान्य गोरगरीबाच्या मुखातला घास पळवणाऱ्या बेईमान शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांसह शासकीय स्वस्त धान्य तस्कर/माफियांच्या भल्यावर येती की काय ? असा प्रश्न उपस्थित करीत आहे......
0 टिप्पण्या