🌟ग्रामीण भागात काँग्रेस वाढवणारा नेता म्हणुन त्यांची पक्षात ओळख🌟
नांदेड : काँग्रेस पक्षाची विचारधारा ग्रागिण भागातील गोर,गरीब,शेतकरी,शेतमजुर,विद्यार्थी वर्गाला ती सोप्या भाषेत समजुन सांगुन पक्षासोबत जोडणारा युवा नेता म्हणुन नांदेड जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्यांची ओळख आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथिल तरूण , सद्या गावचा उपसरपंच, सेवा सहकारी संस्था मंगरुळ चा संचालक आणि काँग्रेस अनुसुचित जाती विभाग हिमायतनगर, तालुकाध्यक्ष या पदांवर कार्यरत असणारा आपल्या कार्यशैलीतुन नवतरूणांना प्रभावित करणारा व जनतेला आपलासा वाटणारा जनतेचा नेता संतोष आंबेकर यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे,राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजेशजी लिलोटिया , महाराष्ट्र काँग्रेस अनुसुचित जाती विभाग प्रदेशाध्यक्ष ,आदरणीय सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या आदेशानुसार त्यांची "जिल्हाउपाध्यक्ष,नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभाग " पदी निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर या निवडीला विशेष महत्व असल्याचे बोलले जात आहे. हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांचं मोठं जाळ असणारा युवक जिल्हा पातळीवर आपलं नेतृत्व सिद्ध करणार आणि हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी तळमळीने झटणार असा विश्वास महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अनुसुचित जाती विभाग आदरणीय प्रफुल सावंत व जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर यांनी निवड करताना व्यक्त केला. काँग्रेस पक्ष कार्यालय नांदेड येथे ही निवड करण्यात आली.
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आदरणीय माधवराव पाटील जवळगावकर यांना काँग्रेस पक्षाने परत एकदा उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे तसेच जवळगावकर साहेबांचे निकटवर्तीय मानले जाणारे संतोष आंबेकर यांची वर्णी जिल्हा कमिटीवर लागल्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला आहे अशी भावना तालुक्यातुन व्यक्त होत आहे.
काँग्रेस पक्षाला घराघरात पोहचवुन पक्षाच्या विचारधारेला बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आणि सद्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत माधवराव पाटील जवळगावकर साहेबांना विजयी करण्यासाठी मेहनत करणार असल्याचे मत श्री. संतोष आंबेकर यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. यावेळी श्री.कुमार कुर्तडीकर ,उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नांदेड,गंगाधर गाडगे,शहर उपाध्यक्ष,तुषार पोहरे लहानकर,शहर महासचिव,रिजवान पटेल खुरगाव,शहर सचिव,शेख नईम जवळगावकर, शहर सचिव,इंजि.प्रमोद श्रीखंडे,आकाश बोरीकर आदींची उपस्थिती होती........
0 टिप्पण्या