🌟शिवसेना (उबाठा) पक्षाच्या दुसऱ्या यादीत बुलढाण्यातील जयश्रीताई शेळकेसह पाच महिलांना उमेदवारी.......!


🌟यात १५ जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे🌟

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली असून यात १५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या यादीत महिलांना अधिकाधिक संधी ठाकरे गटाने दिल्याचे दिसत आहे. १५ जणांच्या उमेदवार यादीत ५ महिलांना संधी दिल्याचे दिसत आहे. मुंबईतील सातत्याने चर्चेत असणा-या शिवडीच्या जागेवरून शिवसेनेच्या ठाकरे गटातच रस्सीखेच सुरु होती. या जागेवरून सुधीर साळवी आणि अजय चौधरी हे इच्छुक होते. आता जाहीर झालेल्या दुसऱ्या उमेदवार यादीत शिवडीच्या जागेवरून अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात १५ जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दोन दिवसांआधी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अनिल गोटे यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली. धुळे शहरमधून त्यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीसोबत रस्सीखेच सुरु असलेल्या श्रीगोंद्याच्या जागेवर अनुराधा नागावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

* बुलढाणाण्यातील जयश्रीताई शेळकेसह पाच महिलांना उमेदवारी :-

ठाकरे गटाच्या दुस-या यादीत पाच महिलांना संधी देण्यात आली आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून जयश्रीताई शेळके, जळगाव  शहरामधुन जयश्री महाजन,हिंगोलीतून रूपाली पाटील, वडाळ्यामधून श्रद्धा जाधव, श्रीगोंदा मतदारसंघातून अनुराधा नागावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.........

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या