🌟चिखलीच्या श्री रेणुका देवी मंदिरात आज होम असल्यामुळे मंदिराचा गाभारा आज दर्शनासाठी बंद राहणार.....!


🌟विजयादशमीच्या दिवशी उद्या सकाळी घट उथ्थापन होईल त्यानंतर गंगाजल अभिषेक होईल व नवरात्रीचे उपास सुटतील🌟

✍️ मोहन चौकेकर

चिखली : चिखलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री रेणुका माता मंदिरात दिनांक ११/१०२४ रोज शुक्रवारला दुपारी १२/३० वाजता मंदिरामध्ये होम हवन🔥होणार आहे. या दरम्यान मंदिराचा गाभारा दर्शनासाठी बंद राहील या काळामध्ये भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी

होमा मध्ये हवन सामग्री तसेच शुद्ध तूप टाकावे नारळ किंवा कोणतेही ज्वालाग्रही पदार्थ टाकण्याची सक्त मनाई आहे 🥥तूप व हवन सामग्री टाकायचे असतील त्यांनी मंदिराच्या ऑफिसमध्ये त्या जमा कराव्या आपल्या सामग्रीची आहुती देण्यात येईल कृपया सर्व भक्तांना नम्र विनंती होमा मध्ये कोणीही नारळ टाकू नये कारण मंदिरामध्ये धूर निर्माण होऊन आपल्या सर्व भक्तांना श्वसनाचे विकार होण्याचा संभव आहे

 होम झाल्यानंतर आरती होईल व त्यानंतर संध्याकाळी आरती होणार नाही त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी सर्व नागरिकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी असे आवाहन रेणुका देवी संस्थान आणि बचानंद स्वामी संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे दिनांक १२/१०/२४ रोज शनिवारी विजयादशमीच्या दिवशी सकाळी घट उथ्थापन होईल त्यानंतर गंगाजल अभिषेक होईल व नवरात्रीचे उपास सुटतील संध्याकाळी शस्त्र पूजन रेणुका मातेच्या शस्त्रांचे पूजन होईल व माता सिमोलंघना साठी निघेल....

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या