🌟उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदी नुसार त्याची संपत्ती १३ कोटी कर्ज ६२ लाख🌟
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत त्यांनी शपथपत्र दाखल केले. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १३ कोटींची संपत्ती आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि अन्य तपशील जाहीर केला. त्यांच्याकडे १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपये इतकी संपत्ती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आयटी रिटर्न फॉर्म नुसार २०२३-२४ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न ७९ लाख ३० हजार ४०२ रुपये इतके आहे. तर २०२२-२०२३ मध्ये ही रक्कम ९२ लाख ४८ हजार ०९४ रुपये इतकी होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांची संपत्ती ६ कोटी ९६ लाख ९२ हजार ७४८ रुपये तर मुलीची संपत्ती १० लाख २२ हजार ११३ रुपये असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे २३ हजार ५०० रुपये रोख रक्कम तर पत्नी अमृता यांच्याकडे १० हजार रुपये रोख रक्कम आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बँक खात्यात २ लाख २८ हजार ७६० रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे १ लाख ४३ हजार ७१७ रुपये आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय बचत योजना, डाक बचत, विमा यात २० लाख ७० हजार ६०७ रुपये गुंतवले आहेत. त्यांची पत्नी अमृता यांनी शेअर, म्यूचल फंड आदी मध्ये मिळून ५ कोटी ६२ लाख ५९ हजार ०३१ रुपये गुंतवणूक केले आहेत
* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोने किती ?
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ४५० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्याची किंमत ३२ लाख ८५ हजार इतकी आहे. तर पत्नी अमृता यांच्याकडे ६५ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ४ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्या नावावर ६२ लाखांचे कर्ज आहे. तर त्यांच्याकडे एकही वाहन नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या