🌟नांदेड येथील वाघी रोड परिसरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर वाहतूक कोंडी....!

 


🌟नांदेड-वाघी रोडवरील वाहतूक कोंडीत तब्बल एक तास अडकली रुग्णवाहिका🌟

 नादेड ;- नांदेड येथील नांदेड वाघी रोड या मार्गालगत असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंगसाठी आलेल्या तिन चाकी आणि चार चाकी वाहनांची संबंधित कार्यालयाकडून पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे सर्वच वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत परीणामी अशी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हा प्रकार नित्याचाच झाला आहे.


प्रादेशिक परिवहन कार्यालया लगत असलेल्या नांदेड-वाघी रोडवर  आज बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान देखील आरटिओ ऑफिस समोर वाहतूक कोंडी झाली असल्याचे पहावयास मिळाले आहे. या वाहतूक कोंडीत रुग्णालयात रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका हि तासभर तरी अडकुन पडली होती नंतर रूग्णवाहिकेच्याच व्यक्तींनी सदरची हि वाहतूक कोंडी दुर केली असल्याचे सांगण्यात आले आहे. 

या वाहतूक कोंडीमुळे ग्रामीण भागातील नागरिक जे शहरी भागात कामासाठी, नोकरीसाठी, व्यापारासाठी व विविध दैनंदिन कामाकरीता नांदेड येथे मोठ्या प्रमाणात येत असतात त्यांना नांदेड येथे पोहचण्यासाठी या वाहतुक कोंडीमुळे वेळेवर पोहचता येत नाही. तासंतास या वाहतूकोंडीचा सामना ग्रामीण भागातील नागरिकांना करावा लागत आहे असाच काहिसा प्रकार आजच्या या वाहतूक कोंडीत सापडलेल्या रूग्णवाहिकेसह एसटी बस व दुचाकी चालक.तिनचाकी वाहन धारकांना झाला असल्याचे पहावयास मिळत आहे. सर्व सामान्य नागरिकांकडून या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी आज मोठ्या प्रमाणात परीसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या