🌟महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांची निवडणूक आयोगाने केली घोषणा....!


🌟राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान तर विधानसभा निवडणुकीचा २३ नोव्हेंबर रोजी लागणार निकाल🌟 

नवी दिल्ली (दि.१५ आक्टोंबर २०२४) भारतीय निवडणूक आयोगाचे सहसंचालक अनुज चांडक यांनी आज मंगळवार दि.१५ आक्टोंबर २०२४ रोजी दुपारी ०३.३० वाजेच्या सुमारास देशातील महाराष्ट्र/झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकी संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र/झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकांसंदर्भात भारतीय निवडणूक आयोग काय घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. 


भारतीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज मंगळवार दि.१५ आक्टोंबर रोजी जाहीर करीत महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणुकीची अधिसुचना जारी केली असून दि.२२ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तर शेवटची तारीख २९ ऑक्टोबर तर अर्जाची तपासणी ३० ऑक्टोबर २०२४  तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख : ४ नोव्हेंबर आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभेची मुद्दत २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आचारसंहिता लागण्या पूर्वीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून निवडणुकीची लगीनघाई पाहायता मिळत होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये एकाच टप्प्यात दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबर २०२४ रोजी तर मतमोजणी: २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणुकीची अधिसुचना जाहीर केली जाणार आहे. २९ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. निवडणूक अर्जाची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार असून उमेदवारी अर्ज ४ नोव्हेंबर पर्यंत मागे घेता येईल. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. याची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबर पर्यंत राज्यात नवीन सरकार अस्तित्वात येईल. 

निवडणुकीत एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याची अपेक्षा आहे. मागील लोकसभा निवडणूक अनेक टप्प्यात घेण्यात आली होती. त्याचा प्रशासन व निवडणूक निकालांवर परिणाम झाल्याची चर्चा होती. या निवडणुका दिवाळीच्या अगोदर किंवा नंतर घ्याव्यात अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. या निवडणुकीत राज्यातील २०.९३ लाख नवीन मतदार आपल्या मतदानाचा पहिल्यांदा आपला हक्क बजावणार आहेत. यामध्ये १.८५ कोटी युवा मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी राज्यातील

३६ जिल्ह्यात १ लाख १८३ मतदार केंद्र आयोगाकडून तयार केले जाणार आहेत. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे. ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ मतदारांना घरुन मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्यावतीने निर्माण केली जाणार आहे. त्यासाठी या ज्येष्ठ मतदारांना एक अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल करावा लागणार आहे. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून १०.७७ लाख मत्तदार आहेत.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या