🌟येलदरी जलाशयावरील खडकपूर्णा प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु🌟
परभणी (दि.२१ आक्टोंबर २०२४) : पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून शनिवार दि.१९ आक्टोंबर २०२४ रोजी दुपारी ०४.०० वाजेपासून पूर्णा नदीच्या पात्रात पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता आज सोमवार दि.२१ आक्टोंबर रोजी या प्रकल्पाचे ५ आणि ६ या क्रमांकाचे दोन दरवाजे बंद करुन पाण्याचा विसर्ग घटविण्यात आला.
येलदरी जलाशयावरील खडकपूर्णा प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पातून पूर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्याचा परिणाम येलदरी जलाशयात पाण्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकार्यांनी शनिवारी दुपारी ०४.०० वाजेच्या सुमारास येलदरी जलाशयाचे सहा गेट ०.५ मीटरने उचलण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ गेट क्रमांक २,३,४,७,८ आणि ९ हे दरवाजे उचलण्यात आले होते दरम्यान यापूर्वीचे ५ आणि ६ या क्रमांकाचे दोन्ही गेट सकाळी सव्वाआठ वाजता बंद करण्यात आले......
0 टिप्पण्या