🌟परभणी जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना शस्त्रधारी सुरक्षा पुरविणेबाबत.....!

 


🌟जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शस्त्रधारी सुरक्षा पुरविण्यात आले असल्याचे आदेश दिले आहेत🌟

(विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024)

परभणी (दि.20 आक्टोंबर 2024) : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन परभणी जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि खर्च नियंत्रक अधिकारी यांना निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रधारी सुरक्षा रक्षक पुरविणे आवश्यक आहे.

त्याकरीता जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 159 अन्वये जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि खर्च नियंत्रक अधिकारी यांना निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रधारी सुरक्षा रक्षक निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यत (दि. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत) पुरविण्यात आले असल्याचे आदेश दिले आहेत......

*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या