🌟पुर्व प्रभारी अधिक्षक बुंगई यांच्यावर अखंड पाठ गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे🌟
नांदेड (दि.१२ आक्टोंबर २०२४) - नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाच्या अखंड पाठ विभागामध्ये झालेल्या लाखों रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाचा आरोपी असलेले तत्कालीन प्रभारी अधिक्षक ठाणसिंघ बुंगई यांचा अटकपूर्व जामिन अर्ज तदर्थ अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्याने पुर्व अधिक्षक बुंगई यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
सचखंड गुरुद्वारा बोर्डातील अखंड पाठ विभागामध्ये वर्ष 2016 ते 19 च्या दरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाला होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते जगदीपसिंघ नंबरदार यांनी वारंवार पाठपुरावा करून त्याची चौकशी लावली होती. या चौकशी समितीच्या अहवालानुसार अखंड पाठ विभागांमध्ये तत्कालीन गुरुद्वारा बोर्ड अधिक्षक बुंगई यांच्यासह चौघांना दोषी ठरविण्यात आले होते. या प्रकरणी बराच कालावधी लोटून देखील गुन्हे दाखल होत नसल्याने ठाणे येथील ॲड. अमरपालसिंघ खालसा यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वजीराबाद पोलीस ठाणे येथे गु.र.नं. - 330/2024 तत्कालीन प्रभारी अधीक्षक ठाणसिंघ बुंगई यांच्यासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी ठाणसिंघ बुंगई यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दुस्ररयादं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सुनावणी झाली असता दोन्ही पक्षाची बाजू ऐकून अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश श्रीमती इंदापूरकर यांनी ठाणसिंघ बुंगई यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. आरोपीची बाजू ॲड.आर.जी.तर सरकार पक्षाच्या वतीने ॲड. रणजीत देशमुख यांनी बाजू मांडली.....
0 टिप्पण्या