🌟पुर्णा शहरातील रेल्वे इन्स्टिट्यूटच्या वतीने मुला मुलींसाठी दहा दिवसीय भव्य क्रिडा स्पर्धा शिबिराला सुरुवात....!


🌟यात किक्रेट,हाॅलीबाल,बास्केटबॉल या खेळाचा समावेश : क्रिडा स्पर्धा शिबिरात क्रिडा शिक्षक करणार मुला मुलींना मार्गदर्शन🌟 


पुर्णा :- पुर्णा शहरातल्या रेल्वे परिसरातील रेल्वे इन्स्टिट्यूटच्या वतीने विविध वयोगटातील मुलांसाठी दि.२७ आक्टोंबर २०२४ पासून विविध खेळांच्या शिबीराला सुरुवात करण्यात आली असून यात किक्रेट,हाॅलीबाल,बास्केटबॉल या खेळाचा समावेश आहे. 


या स्पर्धा शिबिराचा कालावधी तब्बल दहा दिवसांचा असून दि.२७ आक्टोंबर ते दि.०५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आयोजित क्रिडा स्पर्धा रेल्वे परिसरातील आरसीसी रेल्वे इन्स्टिट्यूट मैदानावर आयोजन करण्यात आले असून मुला मुलींचे शारीरिक व मानसिक  आरोग्य उत्तम राहावे त्यांना या खेळाचे ज्ञान,नियम,व सराव व्हावा या हेतुने या क्रिडा शिबिरात विविध क्रिडा शिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

रेल्वे इन्स्टिट्यूटचे प्रमुख बाळू ऊर्फ तुळशीराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या भव्य क्रिडा शिबिरामध्ये प्रा.सुभाष खर्गखराटे,सॅमसंग जेम्स,मिलिंद कांबळे,यशवंत वाघमारे,आनंद काळे, गोतम ससाणे,महेंद्र गवळी,युनूस खान,अँड.जाहेद,मुजाहिद खान, हे तज्ज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त मुला मुलींना सहभाग घ्यावा असे आवाहन राजु भिसे, तुलसीराम, शैलेश विश्वकर्मा, धरमसिहं बायस,अनिल अवसरमले यानीं केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या