🌟परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात तीन दिवसीय परिसंवादाचे आयोजन......!


🌟‘कृषी परिवर्तनाकरिता इच्छुक युवकांसाठी कृषी अभियांत्रिकी शिक्षण’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन🌟

परभणी : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि इंडियन सोसायटी ऑफ  ग्रीकल्चरल इंजिनिअर्स, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेक्स्ट-जेन डिजिटल कृषीसाठी अभियांत्रिकी नवकल्पना’ या विषयावर इंडियन सोसायटी ऑफ ग्रीकल्चरग्रीकल्चरल इंजिनिअर्सची 58 वे वार्षिक अधिवेशन आणि ‘कृषी परिवर्तनाकरिता इच्छुक युवकांसाठी कृषी अभियांत्रिकी शिक्षण’ या विषयावर 12 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

              या  परिसंवादात कृषी अभियांत्रिकीमधील नाविन्यपूर्ण उपाय आणि प्रगती यावर चर्चा करण्यासाठी देश-विदेशातील 500 पेक्षा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे अधिकारी व शास्त्रज्ञ, देशातील विविध राज्यातील कृषि विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना उद्योगांचे प्रतिष्ठित प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि शास्त्रज्ञ, उद्योजक, विविध विभागातील मान्यवर, संशोधक विद्यार्थी, कृषि अभियंता सहभागी होणार आहे. अमेरिका, जर्मनी, जपान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया इत्यादी देशातुन 700 पेक्षा जास्त संशोधन सारांश प्राप्त झाले आहेत.

             या परिसंवादाच्या उदघाटन प्रसंगी भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पदमभुषण डॉ. आर. एस. परोडा, महासंचालक डॉ. हिमांशु पाठक, आयआयडी कानपुरचे संचालक पदश्री डॉ. मनींद्र अग्रवाल, आयआयडी खरगपुरचे संचालक डॉ. व्ही. के. तिवारी, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अभियंता संघटनेचे अध्यक्ष तथा उप महासंचालक कृषि अभियांत्रिकी डॉ. एस एन झा, अमेरिका येथे वास्तव्यास असलेले भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी उप महासंचालक डॉ. गजेंद्र सिंह, कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, पीडीकेव्ही अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, एमपीकेव्ही राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, बीएसकेकेव्हीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, उदयपुर माजी कुलगुरू डॉ. अन. एस. राठोड, अमेरिकेतील परडु विद्यापीठाचे डॉ. किंग्स्ले, नेपाळ येथील डॉ. भिमप्रसाद श्रेष्ठा, आसीयन असोसिएशनचे डॉ.सय्यद इस्माइल, विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदींना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी कृषि व कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाबाबत पदमभुषण डॉ. आर. एस. परोडा यांना आयएसएई मानद फेलाशीप 2024 ने गौरविण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या