🌟महाराष्ट्र नवनिर्माण सेना परभणी जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के यांना अमित राज ठाकरे यांनी एबी फार्म केला बहाल🌟
परभणी :- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात पुर्णा तालुक्यातील दोन भुमिपुत्रांची वर्णी लागली असून शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख विशाल विजयकुमार कदम यांच्या पाठोपाठ आता तळागाळातील सर्वसामान्य जनता शेतकरी/शेतमजूर कामगारांचे लढवैय्ये नेतृत्व करीत ज्यांनी अनेक आंदोलन गाजवली असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख तथा पुर्णा नगर परिषदेचे माजी सदस्य रुपैश भैय्या मनोहरराव सोनटक्के (देशमुख) यांना देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी पक्षाचा एबी फार्म बहाल केला.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय रणांगणात पुर्णा तालुक्यातील शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख रुपेश सोनटक्के या दोन जिल्हाप्रमुखांनी उडी घेतल्याने तालुक्यात समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असले तरी पुर्णा तालुक्यात मतांची आघाडी कोण घेणार हे तर निवडणूक निकालानंतरच कळेल परंतु सध्यातरी मनसेची अधिकृत उमेदवारी रुपेश सोनटक्के यांना मिळाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याचे निदर्शनास येत आहे......
0 टिप्पण्या