🌟पुर्णा तालुक्यातील माखणी येथे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी मंचकराव आवरगंड....!


🌟तर विविध क्षेत्रातील एकुण तीस प्रतिनिधींची सदस्य पदी निवड करण्यात आली🌟

पुर्णा (दि.१० आक्टोंबर २०२४) पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या माखणी येथे दिनांक 09/ रोजी विषेश ग्रामसभा सरपंच गोविंद आवरगंड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी महात्मा गांधी ग्राम तंटामुक्त समितीची कार्यकारणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी मंचक बापुराव आवरगंड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 तर विविध क्षेत्रातील एकुण तीस प्रतिनिधींची सदस्य पदी निवड करण्यात आली. अध्यक्ष व सर्व नवनियुक्त कार्यकारणीचे सरपंच गोविंद आवरगंड, नवनाथ आवरगंड, नेमाजी गाडे, शिवाजी आवरगंड, भानुदास आवरगंड, बापुराव उर्फ धोंडिराम पल्लमपल्ली, मोतीराम आवरगंड, उपसरपंच सारजाबाई पल्लमपल्ली, रंगनाथ आवरगंड चादाजी आवरगंड आवरगंड, बंडू गाडे, नवनाथ नवघरे, दशरथ पल्लमपल्ली, इद्रजित आवरंगड आदीसह ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या