🌟पुर्णा तहसिल कार्यालयासमोर आ.डॉ.रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळ करणार लोकहीतात्सव आमरण उपोषण....!


🌟आ.डॉ.रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळ शहराध्यक्ष नगरसेवक मोकिंद भोळें यांच्या नेतृत्वाखाली ०७ आक्टोंबर रोजी उपोषण🌟


 
पुर्णा (दि.०५ आक्टोंबर २०२४) :- पुर्णा शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलनाचा पवित्रा घेऊन अकार्यक्षम प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकहीतवादी निर्णय घेण्यास भाग पाडणारे पुर्णा नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा आ.डॉ.रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळाचे झुंजार नेते शहराध्यक्ष मोकिंद भोळे यांनी विविध सर्वसामान्य जनतेच्या लोकोपयोगी मागण्यांसाठी प्रशासनाला एका निवेदनाद्वारे आमरण उपोषणाचा इशारा दिला असून जनसामान्यांचे लढवैय्ये नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेवक मोकिंद भोळे यांच्या नेतृत्वाखाली पुर्णा तहसिल कार्यालयासमोर सोमवार दि.०७ आक्टोंबर रोजी सकाळी ११.०० वाजता आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

 आ.डॉ.रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळाचे शहराध्यक्ष मोकिंद भोळे यांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात पुढील लोकोपयोगी मागण्या करण्यात आल्या आहेत :-


१) प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनांमध्ये भ्रष्टाचार करत असलेल्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी तसेच कुशाग्र असोसिएट प्रा.लि. नांदेड या एजन्सीचा सर्व अधिकार काढुन यांना तात्काळ निलंबित करून सखोल चौकशी करण्यात यावी.

२) प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नोंदणी करतांना लाभ धारकांना देण्यात येणाऱ्या शंभर रुपयांच्या पावत्या बनावट छापून झालेल्या फसवणूकीची चौकशी करावी.

३) संजय गांधी निराधार योजनांतर्गत असलेल्या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा ६ हजार रुपये अनुदान देण्यात यावे.

४) वडार समाजा बांधवांसाठी स्मशानभुमी उभारण्या करीता तात्काळ जागा उपलब्ध करून देण्यात यावी.

५) सिध्दार्थ नगर, आंबेडकर नगर व फुले नगर, पुर्णा येथील घरकुलसाठी सर्वे नं. १५८ मधील लाभार्थ्यांना दि.०१/०१/१९९५ नुसार योजनेचा लाभ देण्यात यावा.

६) पुर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील रिलायबल ॲग्रो फुड्सच्या नावावर चालणाऱ्या कत्तलखान्यात नियमानुसार स्थानिक कामगारांना ७०% रोजगार देण्यात यावा.

आदी मागण्यांसाठी पुर्णा तहसिल कार्यालयासमोर आ.डॉ.रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीने दि.०७ आक्टोंबर २०२४ रोजी शहराध्यक्ष नगरसेवक मुकूंद विठ्ठलराव भोळे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्यात येणार असून या आमरण उपोषणास वडार समाज शहराध्यक्ष अर्जुन मुदळकर यांनी देखील जाहीर पाठिंबा दर्शवला असून ते देखील आमरण उपोषणात सहभाग नोंदवणार आहेत या आमरण उपोषणात शहरी व ग्रामिण भागातील नागरीकांनी हाजोरांच्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन मोकिंद भोळे यांनी केले आहे........



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या