🌟धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन....!


🌟सदर शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण,निवास भोजन,आरोग्य,शैक्षणिक साहित्य,शालेय गणवेश मोफत🌟 

परभणी (दि.01 आक्टोंबर 2024) : महाराष्ट्र शासनाकडून धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने परभणी जिल्ह्यातील इच्छुक भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास भोजन, आरोग्य, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश इ. सुविधा शासनाकडून मोफत पुरविण्यात येणार आहेत.

प्रवेशाच्या अटी व शर्ती - सदर योजनेचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी धनगर समाजातील असावा.  विद्यार्थ्यांच्या पालकाने विद्यार्थ्यांचे नावे सक्षम प्राधिका-यांने दिलेल्या धनगर समाजाच्या दाखल्याची सांक्षाकित प्रत सादर करावी.  विद्यार्थ्याचे पालकांचे वार्षीक उत्पन्न मर्यादा रु. एक लक्ष इतकी असावी. सन 2024-25 या वर्षात विद्यार्थी 1 ली ते 5वी या इयत्तेत प्रवेशित असावा. 

परभणी जिल्हयात्तील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता निवड झालेल्या शाळांची यादी खालील प्रमाणे असून सदर शाळांमध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येईल शाळेचे नाव - हिरकणी सी.बी.एस.ई स्कुल चोरवड ता. पालम, जि. परभणी,  विद्यार्थ्यांची संख्या - 50. प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी त्यांचे अर्ज दि. 5 ऑक्टोबर  2024 रोजा पर्यत (सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत) सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, परभणी यांचे नावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी या कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावेत. सदर योजनेचा धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या  सहायक संचालक गीता गुठ्ठे यांनी केले आहे..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या