🌟विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातक शस्त्र मिळाल्याने माजली खळबळ🌟
परभणी : महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असतांना व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतांनाच परभणी शहरातील मध्यवस्तीतील काद्राबाद प्लॉट परिसरात काल शुक्रवार दि.१८ आक्टोंबर २०२४ रोजी सायंकाळी दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने एका पिस्तूलधारी युवकास ताब्यात घेतले.
काद्राबाद प्लॉट भागात एक पिस्तुल बाळगणारा युवक येणार असल्याची माहिती कळाल्याबरोबर दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने सापळा रचला व त्या ठिकाणी संशयास्पद फिरणार्या युवकास ताब्यात घेतले. झडती घेतली तेव्हा देशी बनावटीची पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने आपले नाव सय्यद अमन असल्याचे नमूद केले. अधिक चौकशी केल्यानंतर त्याने साथिदार शेख सद्दाम याचेही नाव पथकास सांगितले. पथकाने या दोघांनाही ताब्यात घेवून चौकशी सुरु केली होती. याबाबतचा तपशील रात्री उशीरापर्यंत हाती आला नाही......
0 टिप्पण्या