🌟पुर्णेतील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात बँकिंग क्षेत्रात पदवीधरांसाठी रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करतांना ते म्हणाले🌟
पुर्णा :- पुर्णा शहरातील श्री.गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील करियर कट्टा आणि "Career Guidance & Placement Cell" च्या वतीने *बँकिंग क्षेत्रात पदवीधरांसाठी रोजगाराच्या संधी* या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील संकल्प अकॅडमिचे अतिश शिंदे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे समन्वयक डॉ. जितेंद्र पुल्ले, डॉ.विजय भोपळे, डॉ. संजय कसाब,डॉ.किर्तनकार यांची प्रमुख उपस्थिती होती.अतिश शिंदे यांनी
विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले कि आज प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. बँकिंग फक्त असे क्षेत्र आहे कि विदयार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली तर हमखास बँकिंग क्षेत्रात रोजगार मिळू शकतो बँकेमधील नोकरीला आजही प्रतिष्ठा आहे. बँकिंग क्षेत्रातही खासगी, सहकारी व सार्वजनिक (राष्ट्रीयकृत) असे तीन प्रकार आहेत. बँकांमध्ये सध्या नोकऱ्यांची चांगली संधी निर्माण झाली आहे. यूपीएससी,एमपीएससी नंतर बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर होण्याची 'क्रेझ' आजही आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसरची पोस्टही मानाची समजली जाते.बौद्धिक आव्हानांसोबत बँकिंग क्षेत्रात आर्थिक स्थिरताही मिळते.लिपिक व प्रोबेशनरी ऑफिसर्सची आवश्यकता बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असते. उमेदवारांना वारंवार लेखी परीक्षांना द्यायला लागू नये यासाठी २६पैकी १९ बँकांनी एकत्र येऊन सामायिक लिपिक परीक्षा व सामायिक प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षा सुरू केली आहे. ही सामायिक परीक्षा आयबीपीएसद्वारे (इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) घेतली जाते. गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीयकृत बँकाच्या बरोबरीच अन्य बँका वा फायनान्शिअल संस्थाही आयबीपीएसच्या परीक्षेद्वारे अधिकारी भरती करताना दिसतात. शासनाच्या अनेक योजनाची व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी महाविद्यालयातील वाणिज्य, विज्ञान, कला शाखेतील विदयार्थ्यांना मार्गदर्शनकेले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ. जितेंद्र पुल्ले यांनी केले तर आभार डॉ. सोमनाथ गुंजकर यांनी व्यक्त केले.श्री नागोराव साळवे विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.......
0 टिप्पण्या