🌟परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघात २६ विधानसभा उमेदवारांनी केले २९ अर्ज दाखल....!


🌟पाथरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ.सुरेश वरपुडकर यांनी महाविकास आघाडीमार्फत आज उमेदवारी अर्ज दाखल केला🌟 


परभणी (दि.२८ आक्टोंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती या दोघा तूल्यबळ प्रतिस्पर्ध्यांसह अन्य पक्षांच्या इच्छुकांसह अपक्ष असे एकूण २६ इच्छुका उमेदवारांनी २९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

            पाथरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांनी महाविकास आघाडीमार्फत आज सोमवार दि.२८ आक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला तर महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती निर्मलाबाई उत्तमराव गवळी विटेकर यांनी महायुतीमार्फत उमेदवारी अर्ज दाखल केला या व्यतिरिक्त बीआरएसपी या पक्षामार्फत सचिन निसर्गंध,राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सईद खान,वंचित बहुजन आघाडी मार्फत सुरेश फड व मराठवाडा मुक्ती मोर्चा मार्फत नारायणराव चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या व्यतिरिक्त रंगनाथ सोळंके, अर्जून भिसे, डॉ. राम शिंदे, गोविंद घाडगे, अरुण कोल्हे, माधवराव फड, गयाबाई माधवराव फड, बाबुराव रावसाहेब कोल्हे, नितीन लोहट, रामराव दादासाहेब टेंगसे, डॉ. जगदीश शिंदे यांनीही पक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. सोमवार पर्यंत एकूण २६ इच्छुकांचे २९ अर्ज दाखल झाले आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या