🌟सेलूतील ज्ञानतीर्थ विद्यालय या शिक्षण संस्थेचा महापराक्रम : प्रश्न का विचारला म्हणून पालकांवर खोटा गुन्हा दाखल🌟
अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सेलु येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत ता.अध्यक्ष सतीश जाधव यांनी ज्ञानतीर्थ विद्यालय सेलु या शाळेला 60% अनुदान असताना देखील शाळेतील मुख्याध्यापीका ह्या शाळेतील मुलांना शैक्षणिक फीस नं भरल्याच्या कारणावरून परीक्षेपासून वंचीत ठेवत आसत वर्ग 1 ली ते 8 पर्यंत मोफत व सक्तीचे हा कायदा अस्तित्वात आसतांना देखील लहान मुलाच्या मानशिकतेशी खेळत त्यांना परीक्षेच्या दिवशी शैक्षणिक फीस नं भरल्या कारणाने वर्गातच वेगळ बसवत आसत हि बाब सेलु तालुकाध्यक्ष सतीश जाधव यांच्या लक्षात आली व त्यांनी स्वतःच्या मुलीची फीस भरलेली आसताना समाज हित लक्षात घेऊन ज्या विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत होते त्यांची बाजु घेत दि.03/07/2023 रोजी मा.सचिव ग्राहक संरक्षण परिषद परभणी यांना पहिले पंत्र दिले,त्यानंतर पालकांच्या तक्रारीला अनुसरून दि.27.10.2023 रोजी गटशिक्षण अधिकारी यांना ग्राहक पंचायत ता.अध्यक्षाच्या लेटरप्याड वर पंत्र दिले परिणामी सदरील शाळेची चौकशी लागली व या दरम्यान ता.अध्यक्ष सतीश जाधव यांना बऱ्याच प्रकारचे अमिष दाखवण्यात आले ,धमकवण्यात आले परंतु ते डगमगले नाहि. चौकशीची मागणी लाउनच धरली या चौकशीच्या अहवालात शाळेने फीस घेता येत नाही हे कबुल केले नंतर पालकातहि जागरूकता निर्माण झाली व पालक फीसला विरोध करू लागले, दरम्यान शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षीची पालक शिक्षक संघ बैठक दि 06/10/24 रविवार रोजी आयोजित करण्यात आली होती या बैठकीस संस्थाध्यक्ष व मुख्याध्यापीका हजर होत्या संस्थाध्यक्ष हे शाळेची बाजु माडत होते 60% अनुदान आसताना शाळेचा खर्च भागत नाहि हे सांगुन फीस शिवाय शाळेचा खर्च चालणे शक्य नाहि आस सागत होते त्या वेळी पालकातुन सतीश जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला की अनुदानीत शाळेंला फीस घेता ऐत नाहि असा शासनाचा जि.आर आहे तेव्हा संस्थाध्यक्ष यांनी जुना राग मनात धरत म्हणाले तु चुप तु कोण मला प्रश्न विचारणार तुला माझ्याशी वाद घालायचा असेल तर बाजुच्या खोलीत जा मी आज संर्व तयारीनिशी आलो आहे तुझी खबरदारी घ्यायला,तेव्हा सतीश जाधव यानी म्हणाले मी पालक या नात्याने प्रश्न विचारलाय कृपया आपण माझे समाधान करावे, तेव्हा डाॅ संजय रोडगे हे व्यासपीठावरून त्याच्या दिशेने त्यांच्या जवळ आले व त्यांच्या कडे बोट करून म्हणाले ऊठ हरामखोर मांगट्या तुझ्या जातीला फुकट शिक्षण घेण्याची सवय लागलेली आहे. तु जर परत फीसच्या संदर्भात प्रश्न विचारलास तर तुला जिवे मारलं आस म्हणाले तेव्हा संर्वच पालक उठुन चला बाहेर असा पालकांचा अपमान करायचा असेल आणी पालकांचे प्रश्न ऐकुन घ्यायचे नसतील तर हि बैठक आयोजित केली कशाला आस म्हणत बैठक हाॅलच्या बाहेर निघून गेले व सेलु पुलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिली व दि.11/10/24 ला अट्राशिटि अॅक्ट द्वारे गुन्हा नोंद करण्यात आला,सदरील संस्थाचालक यांनी या संर्व घटना कृमचा रांग मनात धरून आपल्या संस्थेचा खाजगी कर्मचारी आसनारा श्रीराम प्रतिष्ठान चा प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्फत खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे जोकी हा प्रकार कुठेच घडला नसताना नाटकीय स्वरूप रंगवुन अखिल भारतीय ग्राहक पंचायत ता.अध्यक्ष सतीश जाधव हे निस्वार्थ भावनेने मागील पाच वर्षापासुन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे कार्य करतात त्यांचे खच्चीकरण करून त्यांच्यावर हेतू पुरस्कर त्रास हाच हेतु या मागचा आहे हा खोटा गुन्हा दाखल करनारा महादेव साबळे याच्यावर निवेदनावर तालुका अध्यक्ष जनार्दन आवरगंड राधाताई दुधाटे मधुरा गरड सय्यद सलीम सुहागनकर नारायण सोनटक्के सुशील गायकवाड कविता शिंदे शिवाजी शिराळे भगवान दुधाटे लक्ष्मण शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या शिक्षण संस्था चालकावर कार्यवाही करून त्यास शिक्षा व्हावी व खंडणीचा खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा.....
0 टिप्पण्या