🌟स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माध्यम शास्त्र विभागाचे संचालक प्रा.डॉ.राजेंद्र गोणारकर यांचे प्रतिपादन🌟
पुर्णा :- पुर्णा येथील बोधिसत्व डॉ.बी.आर.आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा व धम्म सेवेत करत असलेल्या महिला मंडळाच्या वतीने सार्वजनिक स्वरूपामध्ये अखिल भारतीय भिख्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली व भदंत पयावंश यांच्या संयोजना खाली दिनांक 12 ऑक्टोबर 2024 या दिवशी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना निमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाने संपन्न झाला.
यावेळी सकाळी 09.00 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करून निरंजना महिला मंडळाच्या अध्यक्षा काशीबाई कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील व महिला मंडळाची उपस्थिती होती बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तर दुपारी 12.30 वाजता बुद्ध विहारांमध्ये भदंत पयावंश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रत्न वंदना पूजापाठ घेऊन महामानव तथागत भगवान बुद्ध मोदी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सजवलेल्या वाहनातून या महापुरुषांच्या जय घोषामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते रॅलीचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जाहीर धम्म सभेमध्ये झाला. सभेचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक वा.रा. काळे गुरुजी होते विचार मंचावर प्रमुख उपस्थिती भदंत पयावांश यांची होती.
प्रमुख अतिथी व वक्ते स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माध्यम शास्त्र विभागाचे संचालक प्रो. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानामध्ये बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 अशोका विजयादशमी दिनी अगोदर स्वतः दीक्षित होऊन आपल्या पाच लाख अनुयायांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली मानव जातीच्या कल्याणासाठी बुद्ध धम्म श्रेष्ठ आहे बुद्ध धम्माची महानैतिक मूल्य आचरणात आणली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खऱ्या अर्थाने अनुयायी आहोत.
धम्म हा चालण्या बोलण्यात वागण्यात दिसला पाहिजे जगाच्या पाठीवरील बौद्ध देश ज्यांनी सर्वांगीण प्रगती केली त्या प्रगतीचा रहस्य ते बुद्धिझम फॉलो करत आहे बुद्धांचे सम्यक विचारप्रणाली मानवी उत्कर्षासाठी साह्याभुत ठरणारी आहे आजच्या कालखंडामध्ये भारतामधून उच्च शिक्षण घेण्यासाठी लोक विदेशामध्ये जातात परंतु बुद्ध कालखंडामध्ये जगामधील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतामध्ये येत असत.
तक्षशिला नालंदा वल्लभी ही विद्यापीठे जगाला ज्ञान देणारी केंद्रे होती बुद्ध धम्माचा विशुद्ध स्वरूप टिकून ठेवण बौद्ध अनुयायाची जबाबदारी आहे त्यामध्ये सरमिसळ होता कामा नये आपल्या धम्मदेशनेमध्ये भदंत पयावंश यांनी बोधी सत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला धम्म त्यानुसार आपलं आचरण आहे का ? याच आत्मपरीक्षण प्रत्येकाने आजच्या प्रसंगी केल पाहिजे त्रिशरण पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग या मधून आपलं जीवन समृद्ध होऊ शकतं असे ते आपल्या धम्मदेशनामध्ये म्हणाले.
पंचशील नाट्य ग्रुपचे बंडू गायकवाड व नाट्य ग्रुपच्या सदस्यानी गेयस्वरूपामध्ये धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त मुलींच्या संचाने
" नमस्कार घ्यावा नमो बुद्ध देवा" या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले प्रमुख उपस्थिता मध्ये ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे नगरपालिकेचे गटनेते मा. उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे ज्येष्ठ समाजसेवक देवराव खंदारे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड नगरसेवक मधुकर गायकवाड एडवोकेट धम्मदीप जोंधळे अशोक धबाले मुकुंद भोळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड इंजिनीयर पीजी रणवीर साहेबराव सोनवणे किशोर ढा कर गे सुनील सावळे प्रक्षित सवणेकर ज्येष्ठ धम्मउपासक एम यु खंदारे अमृत मोरे टी झेड कांबळे हिरामण जोंधळे शिवाजी थोरात गौतम वाघमारेप्रवीण कनकुटे भीमा वाहुळे भूषण भुजबळ आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अतुल गवळी राहुल धबाले सुरज जोंधळे रामू भालेराव राजू जोंधळे धारबा धुमाळे व धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे मा. तालुकाध्यक्ष श्रीकांत हि वाळे यांनी केले आशीर्वाद जातीने कार्यक्रमाची सांगता झाली.....
0 टिप्पण्या