🌟निशिगंधा स्वामीची शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात आली निवड🌟
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विद्या प्रसारिणी शाळेच्या कु.निशिगंध ईश्वर स्वामी या विद्यार्थिनींनी 17 वर्षातील गटात विजय संपादन केला असून. या विद्यार्थिनीची शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजय खेळाडूचे संस्था अध्यक्ष डॉ. दत्तात्रेयजी वाघमारे, सचिव विजयकुमार रुद्रवार,उपाध्यक्ष: भीमरावजी कदम,श्रीनिवासजी काबरा,उत्तमरावजी कदम, साहेबरावजी कदम, मुख्याध्यापक देविदासजी उमाटे, शिवदर्शन हिंगणे यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडूस क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे व क्रीडा मार्गदर्शक सज्जन जयस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.......
0 टिप्पण्या