🌟पुर्णेतील ग्रामदैवत असलेल्या महादेव मंदिर देवस्थानात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञान कथा यज्ञ सोहळ्यास प्रारंभ....!


🌟या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासह किर्तनाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले आहे🌟

पुर्णा [दि.२३ आक्टोंबर २०२४] - पुर्णेतील ग्रामदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील महादेव मंदिर देवस्थानात प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञान कथा यज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला.


या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये दररोज सकाळी ०४.०० ते ०६.०० वाजता काकडा आरती,सकाळी ०६.०० ते ०९.०० ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामूहिक वाचन पारायण,दुपारी ११.०० ते ०२.०० श्री संत चरित्र कथा सायंकाळी ०६.०० ते ०७.०० हरिपाठ व रात्री ०८.०० ते १०.०० किर्तन व जागर अश्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या पारायणायाचे नेतृत्व श्री हभप.नारायण महाराज टाकळीकर व श्री हभप.ज्ञानेश्वर माऊली महाराज पुर्णा हे करत आहेत या सोहळ्यामध्ये श्री हभप.शंकर महाराज काळे एरंडेश्वर श्री हभप. काशिनाथ महाराज माने श्री हभप.गजानन महाराज पुर्णेकर श्री हभप.विक्रम महाराज थोरवे मुंबई,अनिल महाराज बार्शी,महादेव महाराज बोराडे हरिभाऊ महाराज बुचाले आवई यांचे कीर्तने होणार आहे या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासह किर्तनाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान समस्त गावकरी मंडळी पुर्णा यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या