🌟पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकाला डावलून होणारा चुडावा-मरसूल लोहमार्ग उठलाय १०२ शेतकऱ्यांसह पुर्णेकरांच्या मुळावर ?


🌟तालुक्यातील गौर,आडगाव लासीना बरबडी गावातील शेतकऱ्यांचा रेल्वे बायपाससाठी जमीन अधिग्रहणास विरोध🌟


पुर्णा (विशेष वृत्त) :- देशाला स्वातंत्र्य मिळण्यापुर्वीपासून इंग्रज निजाम राजवटीत देखील दक्षिण मध्य रेल्वेतील भौगोलिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाचे रेल्वे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा जंक्शनचे महत्व कमी करणारा आत्मघाती निर्णय दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाणे घेऊन चुडावा ते मरसूळ या बायपास लोहमार्गाला मंजुरी दिली या बासपास लोहमार्गासाठी पुर्णा तालुक्यातील मौ.गौर/आडगाव लासीना/बरबडी या गावांतील १०२ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहण करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर करीत जमीन अधिग्रहणासाठी मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांना दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन व भुमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी अर्ज सीएव्ही अतितातडी ७७१२०/७७१३९ असा मेसेज देखील पाठवण्यात आला.


या संदर्भात पुर्णा तालुक्यातील मौ.गौर/आडगाव लासीना/बरबडी या गावांतील १०२ शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहणास विरोध दर्शवत दि.१० आक्टोंबर २०२४ रोजी पुर्णा तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे परभणी, नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक निती सरकार, उपविभागीय अधिकारी जिवराज डाबकर तसेच भुमी कार्यालय पुर्णा यांना रितसर लेखी स्वरूपात अर्ज देऊन जमीन अधिग्रहणास विरोध दर्शवत अर्जात असे नमूद केले की शेतजमिनीवर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असल्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणास विरोध आहे.

पुर्णा तालुक्यातील मौ.गौर/आडगाव लासीना/बरबडी या गावांतील १०२ शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहणास विरोध दर्शवल्या नंतर देखील आज सोमवार दि.१४ आक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास नांदेड दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील काही अधिकारी तसेच भुमी अभिलेख कार्यालय पुर्णा येथील अधिकारी यांनी चुडावा-मरसूळ बायपास लोहमार्गावरील गौर शिवारातील शेतजमीनींचे मोजमाप केल्याने येथील शेतकऱ्यांनी या जमीन अधिग्रहण संदर्भातील मोजणीस विरोध केला असून दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन १०२ शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करुन शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला म्हणून मुळ किंमतीच्या केवळ तीन पट रक्कम देणार असल्याने देखील शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणास विरोध होत असल्याचे बोलले जात असून रेल्वे प्रशासनाने पाचपट मोबदला देऊन प्रत्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वे प्रशासनात कायमस्वरूपी नौकरीवर घ्यावे अशी मागणी देखील शेतकऱ्यांतून होतांना दिसत आहे.

पुर्णा तालुक्यातील मौ.गौर/आडगाव लासीना/बरबडी या शिवारातून जाणाऱ्या चुडावा-मरसूळ बायपास लोहमार्ग या शिवारातील पुर्णा-पांगरा ढोणे मार्गावरील हनुमान मंदिर परिसरातून वळणार असल्यामुळे या बायपास मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना पुर्णेत देखील थांबा देण्याची जोरदार मागणी होत असून त्यामुळे भविष्यात पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकाचे महत्त्व कमी होणार नाही त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने वेळीच योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी देखील जाणकारांतून व्यक्त केली जात आहे.......


टिप :- कृपया सदरील विशेष वृत्ताची कॉफी करु नये...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या