🌟गुरु रविदास समता परिषदेच्या आक्रोश आंदोलनाने कार्यालय परिसर दणाणला....!


🌟व्यवस्थापक अरुण राऊत यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र देवून कर्ज प्रकरणे लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन दिले🌟


नांदेड (प्रतीनिधी) : संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार आर्थिक विकास महामंडळ नांदेड येथील जिल्हा कार्यालयात मागील काही काळापासून प्रलंबीत पडलेल्या कर्ज प्रकरणाच्या फाईली तात्काळ निकाली काढण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी आज दि. ७ आक्टोंबर रोजी (सोमवारी) अखिल भारतीय गुरु रविदास समता परीषदेच्या वतीने आयोजित सामाजिक न्याय भवन कार्यालसमोर झालेल्या आक्रोश आंदोलनाने कार्यालय परिसर दणाणला होता.

         यावेळी लिडकॉमचे जिल्हा व्यवस्थापक अरुण राऊत यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र देवून कर्ज प्रकरणे लवकरात-लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले. सहा लाभार्थांना लगेच कर्ज वितरण करीत असल्याचे राज्य कार्यालयाच्या वतीने यावेळी कळविण्यात आले. दिवाळीपूर्वी सर्व कर्ज प्रकरणे निकाली निघतील असे यावेळी सांगण्यात आले.

        या आक्रोश आंदोलनाचे नेतृत्व अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले असून यावेळी प्रदेश महासचिव नामदेव फुलपगार, जिल्हाध्यक्ष गंगाधरराव गंगासागरे यांनी आपले विचार मांडले. भविष्यात आणखी तीव्र आंदोलने करण्यात येतील असा ईशारा परिषदेच्या वतीने यावेळी देण्यात आला.

         जिल्हा प्रभारी नारायण अन्नपुरे, महानगर अध्यक्ष श्रीनिवास कांबळे, नायगाव तालुकाध्यक्ष माधव गंगासागरे, हाणमंत गंगासागरे, प्रकाश गायकवाड, आनंद सोनटक्के, सीताराम अन्नपुर्णे, राहुल गोरे, गंगाधर सोनटक्के, बाबुराव नरहिरे, शंकर धडके, पंढरी हिवरे, संतोष कांबळे, संतोष खंदारे, अंतोष सुर्यवंशी, सुरेश वाघमारे, सौ. सुमित्रा वानखेडे, संदिप खंदारे, माणिक फुलपगार, हणमंत उतकर, आनंद कांबळे, सतिष वाघमारे, आनंदा खंदारे यांसह नांदेड, अर्धापूर, नायगांव, हदगाव, आष्टी, लोहा, कंधार, देगलूर, इस्लापूर परिसरातून असंख्य समाज बांधव उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या