🌟पुर्णेत भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांचा वाढदिवस व सत्कार सोहळा आयोजन....!


🌟या सोहळ्यास सर्व धर्मीय बांधवांनी तसेच उपासक-उपासिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे🌟


                      
पुर्णा :- पुर्णा शहरातील बुद्ध विहारात भदंत उपयुक्त महाथेरो यांचा 65 वा जन्मदिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे यावेळी बुद्ध विहारात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता बुद्ध विहाराच्या प्रांगणात बदलत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सामूहिक बुद्ध वंदना धम्मदेशना व सत्कार सोहळा संपन्न होणार आहे माजी नगरसेवक अनिल खर्गखराटे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सत्कार सोहळ्यात प्रमुख धम्मदेशना संपन्न होणार आहे.

यावेळी धम्मदेशनेसाठी प्रदान डॉक्टर बदांत भैया बोधिथेरो भदंत मोदिता मुदितानंद थेरो भदंत पया रत्न थे रो भदंत शील रत्न थे रो उपस्थित राहणार आहेत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणीचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडु जाधव व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राज्याध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्तींआबिरे उपस्थित राहणार आहेत या संपूर्ण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन भंते पायावांश व बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी पूर्ण शहरातील विविध धम्म सेवाभावी महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित राहणार असून दिवसभर बुद्ध विहारात कार्यक्रमाची रेल्वे चल राहणार आहे या सोहळ्यास सर्व धर्मीय बांधवांनी तसेच उपासक-उपासिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक भंतेपयावंश विहार समितीचे सचिव एडवोकेट महिंद्रा गायकवाड यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या