🌟नाशिक,वाशी व मुंबईत अंधेरी पूर्व येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे🌟
✍️ मोहन चौकेकर
सणासुदीचे दिवस असो वा आपत्कालीन परिस्थिती असो पोलीस २४ तास ऑन ड्युटी असतात. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना आरोग्य तपासणीत अडचण येऊ नये यासाठी तीन नवीन रुग्णालय उपलब्ध करण्यात आली आहेत. नाशिक, वाशी व मुंबईत अंधेरी पूर्व येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
वय वर्षे ४० ते ५० या वयोगटातील गृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षांतून एकदा व वय वर्षे ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी बंधनकारक आहे. वैद्यकीय तपासणीसाठी ५ हजार रुपये या प्रमाणे खर्चाची प्रतिपूर्ती गृह विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत ‘अपवादात्मक बाब’ म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून करण्यात येते. गृह विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुंबई व कोकण विभागासाठी तीन नवीन रुग्णालयांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या ३ रुग्णालयांत होणार वैद्यकीय तपासणी :-
- अपोलो क्लिनिक, वाशी
- अपोलो क्लिनिक, अंधेरी (पूर्व)
- अपोलो क्लिनिक, नाशिक
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या