🌟याचीकाकर्ते मंजीतसिंघ जगनसिंघ यांनी अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याची दिली माहिती🌟
नांदेड (दि.०९ आक्टोंबर २०२४) :- नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या अधिकार व मालकीतील शेकडो एकर जमीन बाफना परिसरामध्ये आहे परंतु या जमिनीवर भाडे करारापोटी दिलेल्या भाडेकरूंनी खोट्या कागदपत्रांना आधारे मालकी हक्काचे पुरावे तयार केले आहेत या गुरुद्वारा बोर्डाच्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाची माहिती सरदार मंजीतसिंघ जगनसिंघ यांनी मागितली परंतु जिल्हा प्रशासन सदर माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत आहे.
गुरुद्वारा बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात बाबत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये सचखंड हजुरी खालसा साहिब दिवाण नांदेडचे सदस्य मंजीतसिंघ जगनसिंघ करीमनगर यांनी राज्यशासना विरोधात याचिका क्र.-7345/23 दाखल केली आहे. यावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुद्वारा बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमणांबाबत माहिती घेऊन अतिक्रमणमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने मंजितसिंघ जगनसिंघ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे माहिती अधिकार अन्वये दि. 4 जुलै 2024 रोजी माहिती मागितली ती न दिसल्यामुळे दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी तहसीलदार नांदेड यांचेकडे प्रथम अपील दाखल केले व सुनावणी न घेतल्याने दि.8 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य माहिती आयोगाकडे अपील व तक्रार दाखल केले आहे.
नांदेड जिल्हाधिकारी महसूल प्रशासनाच्यावतीने नांदेड तहसीलदार यांना पत्र लिहून संबंधिताच्या तक्रारीच्या अनुषंगाने गुरुद्वारा बोर्डाची जमीन असलेल्या बाफना -दीपनगर परिसरातील जमिनीचे मूळ अभिलेखांची तपासणी करून सदर मिळकतीचे अतिक्रमणधारकांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 53 अन्वये चौकशी करून नियमाप्रमाणे कारवाई करून केलेल्या कारवाईची माहिती याचिकाकर्त्यास देण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु जिल्हा प्रशासन टाळाटाळ करत असल्याने याचीकाकर्ते मंजीतसिंघ जगनसिंघ यांनी अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. यावर जिल्हाधिकारी महोदय लक्ष देऊन कारवाई करतील काय असा प्रश्न केला जात आहे......
0 टिप्पण्या