🌟हरियाणामध्ये पुन्हा कमळ फुलले,बहुमताचा आकडा पार,49 जागा जिंकत भाजपची हॅट्रिक, काँग्रेसचे स्वप्न भंगले🌟
✍️ मोहन चौकेकर
💫 महाराष्ट्रात चार पाच दिवसात विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होणार व आचारसंहिता लागणार ; हरयाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकालात भाजपाला चांगले यश मिळाल्याने भाजपाचा आत्मविश्वास वाढला त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शक्यता मावळली
💫 हरियाणामध्ये पुन्हा कमळ फुलले, बहुमताचा आकडा पार,49 जागा जिंकत भाजपची हॅट्रिक, काँग्रेसचे स्वप्न भंगले, 37 जागांवरच अडले ; जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता, 49 जागांसह पूर्ण बहुमत, भाजपला 29 जागा PDP चा सुपडा साफ
💫 हरियाणाचा निकाल येताच चंद्रशेखर बावनकुळेंचा आत्मविश्वास थेट 'सातवें आसमान पर'; म्हणाले, महाराष्ट्रातही असाच निकाल लागेल ; निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंचे खासदार अरविंद सावंतांचा हल्लाबोल
💫 जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवूनही भाजपला फायदा नाही; 10 वर्षांनी निवडणूक, तरीही नॅशनल कॉन्फरन्स पक्षानेच मारली बाजी ; हरियाणात प्रतिकूल परिस्थितीतही कल भाजपच्या बाजूने, महाराष्ट्रातील काय निवडणुकांवर परिणाम होणार ?
💫 अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार ; प्रफुल पटेल यांची घोषणा
💫 अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेले आमदार दीपक चव्हाणही साथ सोडणार ; फलटणच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्याची वारंवार मागणी, अजित पवार म्हणाले, कळतं का रे तुला,मलाच उमेदवारी मिळणार की नाही माहिती नाही
💫 .हसन मुश्रीफांनी खेकड्यासारखं पाय ओढले,विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात उभा राहणार ; कागलमध्ये शिंदे गटाच्या वीरेंद्र मंडलिकांनी शड्डू ठोकला,महायुतीत राडा ; रायगडचा गड शरद पवार भेदणार, शिंदे गटातील नेते माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार तुतारी हातात घेण्याच्या तयारीत
💫 धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातील जाळ्यावरून उड्या मारल्या, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी; एसटी प्रवर्गातून अध्यादेश काढण्याची मागणी ; भाजप नेते आशिष शेलारांविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला, वांद्रे पश्चिममधून प्रिया दत्त लढणार, जिंकण्यासाठी आखली रणनीती
💫 मी आज बारामतीत,भेटूया का ? अजित पवारांचा बिग बॉस विनर सूरजला चव्हाणला फोन, सूरज म्हणाला, दादा प्रयत्न करतो ; बुक्कीत टेंगुळ आणणारा 'तो' एक 'राजहंस' ठरू शकतो; गुलिगत सूरजला 'ट्रोल' करणाऱ्यांना किरण मानेंचं सडेतोड उत्तर
💫 कलाकारांचं मुंबईतील घराचं सप्न साकार! गौरव मोरे, शिव ठाकरे, गौतमी देशपांडे आणि निखिल बनेला म्हाडाची लॉटरी ; राजू शेट्टींना लॉटरी,खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; पवईतील घराची किंमत 1 कोटी 20 लाख
💫 विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या योगेश बैरागी यांना केलं चितपट ; माझं नाव घेऊन विनेश फोगाट निवडणूक जिंकली, पण काँग्रेसला बुडवलं; हरियाणाच्या निकालानंतर बृजभूषण सिंहांनी लगावला टोला
💫 मविआच्या जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना अन् काँग्रेसमध्ये मुंबईतील तीन जागांवरुन रस्सीखेच, मतदारसंघ कुणाला मिळणार याची कार्यकर्त्यांना उत्सुकता
💫 हरियाणा विधानसभेच्या गत निवडणुकीत किंगमेकर, यंदा पक्षाचा टांगा पलटी; दुष्यंत चौटालांची अवस्था ना घरका ना घाट का
💫 देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं उमेदवारी नाकारली, अपक्ष रिंगणात उतरली; सावित्री जिंदाल यांचा दणदणीत विजय
💫 हरियाणात भाजपची हॅटट्रिक, तिसऱ्यांदा सत्ता स्थापणार...गेल्या वेळच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढूनही सत्तास्थापनेची संधी हुकली...
💫 जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं सरकार येणार...पण काँग्रेसच्या जागा घसरल्या...भाजपला जम्मूत मोठं यश...पीडीपीचं पानिपत...
💫 काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात...दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात विजयाचा जल्लोष...
💫 हरियाणातल्या विजयानंतर महाराष्ट्रातही भाजपचा जल्लोष...आत्मविश्वास वाढला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया... फेक नरेटिव्हवरुन विरोधकांना टोला..
💫 भाजपशी थेट सामना होतो तिथे काँग्रेस कमकुवत पडते'.. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचा निकालानंतर काँग्रेसला टोला, रणनीती तपासण्याचा सल्ला...
💫 महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपाची उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर प्रभारींसह ज्येष्ठ नेत्यांची बैठक...
💫 अजित पवार बारामती मधूनच लढणार.. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांची घोषणा, तर अजित पवारांनी बारामतीतूनच लढावे म्हणून बारामतीकर आक्रमक
💫 मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, काँग्रेस, राष्ट्रवादीला माझा पाठिंबा, उद्धव ठाकरे यांची विनंती, मविआमध्ये कोणताही वाद होणार नसल्याचीही ग्वाही
💫 मविआच्या आजच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला..११ तारखेला पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची यादी जाहीर करण्याची शक्यता
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या