🌟पुर्णा तहसिलदारांचा बोथट कारभार उघड ? जप्त करण्यात आलेला अवैध चोरटा वाळूसाठा कठोर कारवाई नकरताच गुत्तेदाराच्या हवाली..!


🌟अवैध चोरट्या वाळूचा साठा प्रकरणात गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर व महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंटशी महसुल प्रशासनाचे हितसंबंध उघड🌟


पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा तहसिलचे तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी माधवराव बोथीकर व महसुल प्रशासनाचा बोथट कारभारामुळे गौण खनिज तस्कर माफियांकडून चोरट्या अवैध वाळूची प्रचंड प्रमाणात खरेदी करीत कोट्यावधी रुपयांच्या शासकीय महसुलाला कात्री लावणाऱ्यां भ्रष्ट शासकीय गुत्तेदारांचे चांगभलं होत असून असाच गंभीर प्रकार पुन्हा एकदा उघड झाला असून संपूर्ण परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यात देखील एकही अधिकृत शासकीय वाळू धक्का चालू नसतांना पुर्णा शहरासह तालुक्यात राज्य शासनासह केंद्र शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीतून चालत असलेल्या विकासकामांचे गुत्तेदार शासनाला नियमानुसार अधिकृतरित्या जिएसटीसह शासकीय महसूलाचा भरणा करीत बांधकामासाठी लागणारे गौण खनिज वाळू/दगड खडीसह मुरुमाचा प्रचंड प्रमाणातील साठा खरेदी करतात तरी कोणत्या अधिकृत बांधकाम साहित्य व्यावसायिकांकडून असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.


(महसूल प्रशासनाच्या जप्तीतील ४५० ब्रास अवैध चोरट्या वाळुसाठ्यासह जप्तीनाट्यातून वगळण्यात आलेल्या शेंकडों ब्रास वाळुसाठ्याची मिक्सर प्लॉन्टवर विल्हेवाट लावताना बांधकाम गुत्तेदार कंपनी प्रशासन)

या संदर्भात दि.०५ ऑगस्ट २०२४ रोजी आम्ही तहसिलदार माधवराव बोथीकर व महसूल प्रशासनाचे अधिकारी तथा नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना रितसर लेखी स्वरूपात तक्रार अर्ज देऊन शहरातील पुर्णा-पांगरा ढोणे मार्गावरील दुरसंचार विभागाच्या कार्यालयासमोरील रेल्वे उड्डाणपूल बांधकाम गुत्तेदार कंपनी गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली/महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन ली या कंपनीच्या मिक्सर प्लॉन्टवर तसेच पुर्णा रेल्वे प्लॅटफॉर्मवर क्रमांक एकच्या नुतनीकरण बांधकामांच्या गुत्तेदारांनी अवैध चोरट्या वाळूच्या प्रचंड प्रमाणात केलेल्या साठ्याची तात्काळ जप्ती करून कठोर कारवाईची मागणी केली होती परंतु सदरील तक्रार अर्ज देऊन देखील बेजबाबदार तहसिलदार बोथीकर व महसूल प्रशासनाने संबंधित कंपनीला एक नोटीस पाठवण्या व्यतिरिक्त जवळपास ५० दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई केली नाही व अवैध चोरट्या वाळूचा साठा करणाऱ्या संबंधित कंपन्यांना शेंकडों ब्रास चोरट्या अवैध वाळूसाठ्याची विल्हेवाट लावण्याची जाणीवपूर्वक संधी दिल्या जात असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे या बेजबाबदार कारभारा विरोधात आम्ही शुक्रवार दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी जंग-ए-अजित न्युज वेबवृत्त वाहिनीने 'पुर्णा-गोदावरी' नदीपात्रांतील शासकीय संपत्ती असलेल्या गौण खनिज वाळूवर अक्षरशः दरोडे ? महसूल प्रशासनातील काही 'अवैध वाळू तस्कर हितकऱ्यांचे' चोरट्या वाळूसाठेबाज भ्रष्ट गुत्तेदारांशी जुळले धागेदोरे ? 

(महसूल प्रशासनाच्या जप्तीतील ४५० ब्रास अवैध चोरट्या वाळुसाठ्यासह जप्तीनाट्यातून वगळण्यात आलेल्या शेंकडों ब्रास वाळुसाठ्याची विल्हेवाट लावताना बांधकाम गुत्तेदार कंपनी प्रशासन)

या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करतात तहसिलदार माधवराव बोथीकर महसूल विभागाचे तलाठी गणेश गोरे, सिद्धार्थ खिल्लारे, गौतम घाटे,मुरलीधर मोरे यांच्या पथकाने पुर्णा रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम करणाऱ्या गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली/महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेट या कंपनीच्या आडगाव लासीना शिवारातील पुर्णा-पांगरा ढोणे मार्गावरील दुरसंचार विभागाच्या कार्यालयासमोरील मिक्सर प्लॉन्टवरील शेंकडों ब्रास रेती स्थळावर धडक देत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रसारमाध्यमांच्या डोळ्यात धुळ झोकण्यासाठी कारवाईनाट्य रंगवले यावेळी बांधकाम गुत्तेदार कंपनीतील घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांना या अवैध वाळूसाठ्या संदर्भात भरलेल्या रॉयल्टी अर्थात शासकीय महसूला बद्दल माहिती मागितली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या पावत्या आढळून न आल्याने अवैध वाळूसाठ्याची कुठल्याही प्रकारचे मोजमाप नकरता शेंकडों ब्रास वाळूसाठ्याला केवळ ४५० ब्रास वाळूसाठ्यात रुपांतर करीत त्याची केवळ किंमत ०३ लाख ५० हजार रुपये दाखवून अवैध वाळूसाठ्याची नियमानुसार जप्ती करुन त्या अवैध चोरट्या वाळूसाठ्याच्या लिलावात संदर्भात रितसर जाहीर प्रकटन न देता व संबंधित कंपनी विरोधात कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई किंवा जप्ती साठ्याच्या पाचपट दंडात्मक कारवाई नकरता हा जप्ती पंचणामातील अवैध चोरटा वाळू साठा संबंधित बांधकाम गुत्तेदार कंपनीच्या हवाली केलाच कसा ? असा प्रश्न उपस्थित होत असून संबंधित कंपनी या जप्ती पंचणाम्यातील चोरट्या अवैध ४५० ब्रास वाळूसाठ्यासह पुर्णा-पांगरा ढोणे मार्गावरील मिक्सर प्लॉन्टवर असलेल्या शेंकडों ब्रास अवैध वाळू साठ्याची विल्हेवाट लावतांना आढळून आल्यामुळे तहसिलदार माधवराव बोथीकर व महसुल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीला जप्तीनाट्य रंगवतांनाच चॅलान दिले की काय ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून त्यामुळे पुर्णा महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांसह तहसिलदार माधवराव बोथीकर यांचा बोथट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहावयास मिळत आहे......


(गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा ली कंपनीच्या आडगाव लासीना शिवारातील मिक्सर प्लॉन्टवर दि.०५ ऑगस्ट २०२४ रोजी उपलब्ध असलेला अंदाजे १२०० ते १५०० ब्रास अवैध चोरटा वाळूसाठा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या