🌟भारतीय जनता पार्टीचे नेते सरदार गुरुदीपसिंघ संधू यांची मागणी🌟
नांदेड (दि.०७ आक्टोंबर २०२४) - देशभरामध्ये सण उत्सवाचे वातावरण सुरू आहे सिख धर्मियांमध्ये साजरे केले जाणारे प्रमुख सणांपैकी दसरा व दिवाळी जवळ आले आहेत असे असताना अबचलनगर व गुरुद्वारा परिसरातील नागरिकांना विजेच्या लपंडावाने त्रस्त केले आहे. सण उत्सवाच्या काळामध्ये किमान विजेचा लपंडाव थांबवा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक मराठवाडा अध्यक्ष गुरुदीपसिंघ यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
देशभरामध्ये सण उत्सवाचे वातावरण सुरू झाले आहे. सिख धर्मियांकडून प्रामुख्याने साजरे केले जाणारे सणांपैकी एक दसरा व दिवाळी जवळ आला असून त्याची जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे. असे असताना गुरुद्वारा परिसर व अबचलनगर परिसरामध्ये महावितरणचा ढिसाळ कारभार दिसत आहे. मागील काही महिन्यापासून या भागातील नागरिकांना दिवसा आणि रात्री देखील विजेच्या लपंडावामुळे त्रस्त व्हावे लागत आहे. सणाचा काळ सुरू झाला असल्यामुळे या काळामध्ये तरी वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक मराठवाडा अध्यक्ष गुरुदीपसिंघ संधु तसेच अमरजीतसिंग कुंजीवाले, हरपितसिंघ पुजारी यांनी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे........
0 टिप्पण्या