🌟माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केली उमेदवारी🌟
परभणी (दि.२३ आक्टोंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातून माजी राज्यमंत्री काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांच्या विरोधात महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा सोडण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख अजित पवार यांनी या मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर यांच्या मातोश्री तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर यांना उमेदवारी बहाल केली.
या मतदारसंघात महायुतीतील भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन्ही मित्रपक्षाने दावा ठोकला विशेषतः शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार मोहन फड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार राजेश विटेकर या तीघांचाही दावा प्रबळ होता. त्यामुळेच महायुतीतील पक्षश्रेष्ठींसमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता. परंतु, प्रबळ दावेदार फड यांचीच प्रकृती बरी नसल्यानेच महायुतीतील भारतीय जनता पार्टीने पाठोपाठ शिवसेनेना श्रेष्ठींनीही चाचपणी अखेर जागा वाटपातून आखडता हात घेतला. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने मिरिट बेसवर जागा लढविण्याचा निर्णय घेवून उमेदवार निश्चितीबाबत हालचाली कमालीच्या गतीमान केल्या होत्या.
गेल्या दोन दिवसांपासून ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरपुडकरांविरोधात सर्वार्थाने भक्कम उमेदवार म्हणून विटेकर कुटूंबियातील सदस्यांनाच रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. विशेषतः विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य राजेश विटेकर यांच्याच नावाचा प्रामुख्याने विचार सुरु केला. परंतु, पर्याय म्हणून राजेश यांच्याऐवजी त्यांच्या मातोश्री तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष श्रीमती निर्मला विटेकर यांच्या उमेदवारीबाबत श्रेष्ठींनी गांभीर्याने विचार विनिमय सुरु केला. त्यामुळे विद्यमान आमदार विटेकर किंवा त्यांच्या मातोश्री श्रीमती निर्मला या दोघांपैकी एकाची उमेदवारी मिरिट बेसवर निश्चित होईल, असे चित्र हळूहळू स्पष्ट होवू लागले होते. या दरम्यानच सोमवारी राष्ट्रवादीच्या श्रेष्टींनी विद्यमान आमदार विटेकर यांना पाचारण करीत पाथरीतील कोरा एबी फॉर्म सुपूर्त केला. त्यामुळे आता उमेदवाराबाबत उत्सुकता आणखीनच ताणली गेली होती......
0 टिप्पण्या