🌟परभणी रेल्वे स्थानकावर लोहमार्ग (जीआरपी) पोलीस स्थानकाची मागणी....!


🌟मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आली मागणी🌟  


 
परभणी (दि.१७ आक्टोंबर २०२४) - परभणी जिल्ह्यात मागील महिनाभरात  पिंगळी, वडगाव आणि पोखर्णी येथे   चालत्या रेल्वला सिंगल मध्ये बिघाड करून त्या थांबवून प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडल्या या पार्श्वभूमीवर  प्रवाशांना पोलीस संरक्षण मिळावे म्हणून परभणी येथे रेल्वे  स्थानकावर जी आर पी पोलीस स्टेशन मंजूर करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत दक्षिण मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापक यांना एक निवेदन  पाठवण्यात आले असून त्यात म्हटले आहे की परभणी जिल्ह्यात मागील  तीस दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सिग्नल मध्ये बिघाड करून रात्रीच्या सुमारास रेल्वे थांबवून  प्रवाशांना लुटीच्या घटना घडल्या आहेत.त्या मुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना प्रवासी असुरक्षित झाले आहेत.

 जिल्ह्यात पिंगळी, पोखरणी तसेच वडगाव स्थानकावर घडलेल्या घटना एकसारख्या आहेत.अश्या घटना रोखण्यासाठी प्रवाशांना पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक आहे. परभणी रेल्वे स्थानकावर सध्या जीआरपी ची पोलीस चौकी आहे व या ठिकाणी खूपच कमी मनुष्यबळ आहे त्यामुळे परभणी रेल्वे स्थानकावर जीआरपी पोलीस स्टेशनची स्थापना केली तर पुरेसा मनुष्यबळ मिळेल त्यामुळे अशा घडणाऱ्या घटनांना आळा घालता येऊ शकतो तसेच आरपीएफ चा स्टाफही परभणी स्थानाकावर वाढवून मिळावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने निवेदन पाठवण्यात आले असून या निवेदनावर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्रा. सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, राजेंद्र मुंडे, माणिक शिंदे, बलसेकर डॉ. राजगोपाल कलानी ,बाळासाहेब देशमुख, विठ्ठल काळे, दयानंद दीक्षित , कदिर लाला  आदि च्या स्वाक्षऱ्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या